चिमटा।दैनिक पुण्यनगरी।22डिसेंबर2008 (४)तरुण तुर्क म्हातारे गर्क
पक्षीय घोषणा झाल्या
तरूण रक्ताला वाव आहे
त्यांच्याच लेकाचे,
त्यांच्याच लेकीचे
उमेदवारीसाठी नाव आहे.
अशा तरूण तुर्कांसाठीच
सारे म्हातारे गर्क आहेत !
रक्त नवे असले तरी
शेवटी त्यांचेच अर्क आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
(५) आता तरी शहाणे व्हा....
आपल्याला मूर्खात काढण्याएवढी
दुसरी सोपी गोष्ट नाही
जे काढ्ती मूर्खात आपल्याला
त्यांचा तर चेहराच स्पष्ट नाही.
आपल्या मूर्खपणाची सवय
भविष्य़ालाही घातक ठरू शकते !
आपला इतिहास साक्षी आहे
मूर्खांवर कुणीही राज्य करू शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
(५)चळवळ ते वळवळ
कुणी मतांचा मागितला जोगवा
इथले इंद्रपद मिळविण्यासाठी
कुणी लावली जनतेची कवाडे
सत्तेचे गवई होण्यासाठी.
रामदासाला तर आठवणच नाही
नामदेवही ढसाळ निघाला !
बाबासाहेब,
चळवळीचा निळा प्रकाशही
इथे सूर्याजी पिसाळ निघाला !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, April 1, 2009
वात्रटिका
(१) II शब्द्प्रभूंचे अभंग II
कथा,कादंबर्या
कविताही पाड्तो
परिसंवाद झोड्तो
टाईमपास ॥१॥
आमचे आम्हीच
खांदले गर्दाड
झालो मुर्दाड
जगण्यासाठी ॥२॥
कसले स्वातंत्र्य ?
कसली अभिव्यक्ती ?
एकच युक्ती
गेंडोबाची ॥३॥
एका महाबळेश्वरी
झाले गर्वहरण
झुंडशाहीला शरण ।
गेलो गेलो ॥४॥
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
(२) विरोधाभास
अहिंसा राहीली बाजूला
तोंडी हिंसेचाच प्रचार आहे
आई वाचविते प्राणी
लेकराचा वेगळाच विचार आहे.
वरुण-वरुण पाहून कधी
आतला भरवसा देता येत नाही !
फ़क्त आडनाव लावल्याने
कुणाला ’ गांधी’ होता येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
(३)संभाजी बिडी
मराठी अस्मितेच्या नावाने
पोकळ तुतार्या फ़ुकल्या जातात
अजूनही छ्त्रपती संभाजींच्या नावाने
महाराष्ट्रात बिड्या विकल्या जातात.
त्यांना दॊष कसा तरी कसा द्यावा?
ते तर बिड्या विके आहेत !
ज्यांनी निषॆध करायचा
तेच खरे बिड्या फुके आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment