Wednesday, April 29, 2009

राजकीय अंधश्रध्दा

राजकीय अंधश्रध्दा

या पक्षातुन त्या पक्षात
असंतुष्ट आत्मे भटकत असतात.
त्यांना काहीच वाटले नाही तरी
आपल्याला मात्र खटकत असतात.

असे भटकते आत्मेच
अनुभवी म्हणून गणले जातात !
पक्षबाह्य संबंध ठेवणारेच
मुरब्बी नेते मानले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...