Friday, April 3, 2009

००००००० वात्रटिका ०००००००
******************

प्रचारसंहिता

प्रचार असावा प्रचारासारखा
उगीच कुणाच्या नकला नको
मुद्दयापुरता मुद्दा काढावा
उगीच कुणाच्या अकला नको.

प्रचार असावा प्रचारासारखा
उगीच कुणावर गरळ नको
उचलली जिभ लावली टाळ्याला
उगीच लोकांवर भुरळ नको.

प्रचार असावा प्रचारासारखा
त्यात कोणतीही तेढ नको !
प्रचारकांना कळते सारे
उगीच पांघरलेले वेड नको !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...