Friday, April 3, 2009

वात्रटिका

००००००-वात्रटिका-००००००
*****************
अक्षयकुमारची ’चैन’ बाजी

रेल्वेची चैन खेचावी
तशी रैंप वर चैन खेचली गेली
नजरेतच अश्लिलता असते
अशी थापही सुचली गेली.

रैंप वरच्या अश्लिल चाळ्यांची
नट-नट्यांना कुठे लाज आहे ?
अक्षयकुमार तर बोलुन चालुन
पट्टीचा स्टंटबाज आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...