Tuesday, January 18, 2011

कांदा एके कांदा

कधी कांदा हसवतो,
कधी कांदा रडवतो.
आपल्याला झळ बसताच
आपण ऊर बडवतो.

ज्याला खरी झळ बसते
त्याला गृहीत धरीत नाहीत !
कांदा उतरला-चढल्याने
आपण आत्महत्या करीत नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

2 comments:

विजय बनकर said...

डोळसे सर, नमस्कार. बरेच दिवस झालेत आज सांगू, उद्या सांगू परंतु वेळच मिळाला नाही. परंतु आपला एकूण एक अंक वाचत होतो. आतापर्यंत आपल्या " सूर्यकांती " चे एकूण १५ अंक मी संग्रहीत केले आहेत. आणि ते मी माझ्या मित्रांनाही वाचण्यासाठी देत आहे व त्या सर्वांनाही ते फारच आवडतात. आपला या वेळचा " कांदा " स्पेशल अंक फारच छान झाला आहे. संक्रांति च्या मुहूर्तावर कांद्यावर आलेली संक्रांत आपण योग्य रीतीने वाचकांसमोर सादर केली ती निव्वळ अप्रतिम.
शेवटी माझ्याकडून आपणाला व आपले अंक वाचणाऱ्या सर्व वाचकांना संक्रांतीच्या शुभेच्छा व आगामी अंकासाठी आपल्याला शुभेच्छा.....!
विजय बनकर रा. शिवूर ता. वैजापूर जि. औरंगाबाद . (९४ २१ ९७ २५ ३३ )

Anonymous said...

hiiiiiiiiiiiii

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 23एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -321 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1L7d09rSTvZKajObapVCl...