Showing posts with label जातीवंत विचार. Show all posts
Showing posts with label जातीवंत विचार. Show all posts

Monday, June 29, 2020

जातीवंत विचार

आजची वात्रटिका
----------------------------
जातीवंत विचार
जसा जातीचा पंथ लागतो,
तसा जातीचा संत लागतो.
फक्त एवढेच नाहीतर,
जातीचाच विचारवंत लागतो.
वरवर जाती अंत आहे,
आत जाती-जातीचा जंत आहे !
चळवळीपासून वळवळीकडे,
या प्रवासाची खरी खंत आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5843
दैनिक पुण्यनगरी
29जून2020

सुपर अल निनो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- सुपर अल निनो सुपर अल निनोच्या चाहूलीने, वातावरण तापायला लागले. भावी संकटांच्या भीतीमुळे, जग थरथर...