Showing posts with label तुलनात्मक चर्चा. Show all posts
Showing posts with label तुलनात्मक चर्चा. Show all posts

Monday, February 16, 2026

तुलनात्मक चर्चा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
तुलनात्मक चर्चा
नको त्यांची नको त्यांच्याशी,
अप्रस्तुत अशी तुलना होते.
एकाचे होते उदातीकरण,
दुसऱ्याची मात्र अवहेलना होते.
कुणाचीही कुणाशी तुलना,
कुणा कुणाला भलताच नाद आहे.
अप्रस्तुत अशा तुलनेवरून,
ज्याचा त्याचा वितंडवाद आहे.
पराचा केला जातो कावळा,
सुतावरून स्वर्ग गाठला जातो !
कळून सवरूनसुद्धा मग,
आपलाच मुद्दा रेटला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9191
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 फेब्रुवारी 2026
 

daily vatratika.. 24Sept2026