Tuesday, June 4, 2019

हीट विकेट

क्रिकेट विश्वकप 
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
हीट विकेट
तू मैदानावर नसलास की,
मैदान कसे खायला बघते.
वेडे मन माझे,
माझी 'हीट विकेट' घ्यायला बघते.
मा झ्या विकेटची भीती नाही,
पण डाव कसा आवरायचा रे !
विस्कटलेला खेळ माझा,
पुन्हा कसा सावरायचा रे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी 
दैनिक लोकप्रश्न 
20मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

निवडणूकीनंतरचा हिशोब

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
निवडणूकीनंतरचा हिशोब
ज्यांनी कुणी खाल्ले होते,
ते ते ओकायला लागले.
ज्यांनी केली गद्दारी होती,
त्यांना ठोकायला लागले.
कुणाच्या आरोपात तथ्य,
कुणाची पोकळ बडबड आहे !
पुन्हा तेच ठराविक उत्तर,
ईव्हीएम मध्येच गडबड आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6967
दैनिक झुंजार नेता
4जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका

लंगडे समर्थन

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
लंगडे समर्थन
कधी उलट्या असतात,
कधी सुलट्या असतात.
राजकीय भूमिकांच्या
आलट्या-पलट्या असतात.
त्याच्यात ह्याचे तंगडे,
ह्याच्यात त्याचे तंगडे असते!
कितीही घोडे दामटले तरी,
समर्थन मात्र लंगडे असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5467
दैनिक पुण्यनगरी
4जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका

Monday, June 3, 2019

नाईट वॉचमन...

क्रिकेट विश्वकप
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
नाईट वॉचमन
माझ्या कोसळलेल्या डावाचा
तू नाईट वॉचम न होशील का?
म ला तुझा डाव नकोय,
किमान काही क्षण देशील का?
मा झ्या दु:खाला तशी,
कुठलीच डे आणि नाईट नाही !
अरे मी टॉसच हरलेय,
खरचं मी वाईट नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
15मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

क्रिकेट विश्वकप
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
नाईट वॉचमन
माझ्या कोसळलेल्या डावाचा
तू नाईट वॉचम न होशील का?
म ला तुझा डाव नकोय,
किमान काही क्षण देशील का?
मा झ्या दु:खाला तशी,
कुठलीच डे आणि नाईट नाही !
अरे मी टॉसच हरलेय,
खरचं मी वाईट नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
15मार्च 2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------

उपहास दर्शन

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
उपहास दर्शन
व्यंग,उपरोध आणि उपहास,
हल्ली पचला जात नाही.
सूचित केलेला गर्भित अर्थही,
नीटपणे वाचला जात नाही.
व्यंग,उपरोध आणि उपहास,
हा सकारात्मक द्रोह असतो.
जो गैरसमज करून घेतो,
त्याचा तो पक्का पूर्वग्रह असतो.
दाखवले ते समजून घ्यायला,
कुठे कुणाची नजर साफ असते !
त्याला पुण्याचे दर्शन घडेल कसे?
ज्याच्या नजरेतच पाप असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6966
दैनिक झुंजार नेता
3जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------

पाणीबाणी

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
पाणीबाणी
पाकिस्तानशी लढावे तसे,
शेजाऱ्यांशी लढावे लागते.
जमेल तेवढे टँकरचे पाणी,
आपल्याकडे ओढावे लागते.
घोट घोट पाण्यासाठी,
पाण्याप्रमाणे शुद्ध हरपली जाते.
उरली-सुरली माणुसकी,
दुष्काळामध्ये करपली जाते .
ज्याचा टँकर,तोच अँकर,
टाईमटेबलचे तर नाव नाही !
याहून वेगळे चित्र असेल,
असे एकही तहानलेले गाव नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-5466
दैनिक पुण्यनगरी
3जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

Sunday, June 2, 2019

कॉमेंट्री

क्रिकेट विश्वकप
स्पेशल वात्रटिका
-----------------------------
कॉमेंट्री
बालपणीचे क्रिकेट
खरचं किती वेगळे होते.
माझे रुसणे,फुगणे,खेळणे,
तुझ्यासाठीच सगळे होते.
आता रुसणे नाही,
फुगणे नाही;
माझी खेळी बहिकवली जाते !
कोपऱ्या-कोपऱ्यावर मग
तुझी माझी कॉमेंट्री
ऐकवली जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
24फेब्रुवारी2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

संसदीय कुंभमेळा

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
संसदीय कुंभमेळा
खासदारांची संख्या बघून,
आपण एक अंदाज करू शकतो.
भविष्यात लवकरच,
संसदेत कुंभमेळा भरू शकतो.
संधीप्रमाणे वाहत्या गंगेत,
आपले साधुत्व दान केले जाईल!
शाही स्नानाच्या ऐवजी,
इथे लोकशाहीस्नान केले जाईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6965
दैनिक झुंजार नेता
2जून2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

विलिनीकरणाची चावी

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
विलिनीकरणाची चावी
पंतप्रधानपदाची इच्छा
अजून भावी ती भावी आहे.
तोपर्यंतच विलिनीकरणाची
कुणाकडून तरी चावी आहे.
कुणी गुरगुरायला लागले,
कुणी गरगरायला लागले !!
घड्याळातले काटे,
उलटे-सुलटे फिरायला लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5465
दैनिक पुण्यनगरी
2जून2019
-----------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com

Saturday, June 1, 2019

इंग्रज कृपा

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
--------------------------------
इंग्रज कृपा
इंग्रजांनी लावलेल्या आगीच्या
कुठे ना कुठे ठिणग्या आहेत.
क्रिकेट आणि राजकारण,
ह्या इंग्रजांच्याच देणग्या आहेत.
क्रिकेट आणि राजकारणातही
आपली मोठी गरुडझेप आहे !
दिल्लीपासून गल्लीपर्यंत बघा,
सगळीकडे दोघांचीच टेप आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6964
दैनिक झुंजार नेता
1जून2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

ओव्हर थ्रो

क्रिकेट विश्वकप 
स्पेशल वात्रटिका
------------------
ओव्हर थ्रो
तू लाँग ऑफला,
मी लॉंग ऑनला.
डोळ्यातले पाणी आवरीत,
तो तिला म्हणला.
पहिला डाव विसरून,
आता आपले क्षेत्र राखीत जा !
कधी मनात आलेच तर,
एखादा ओव्हर थ्रो,
माझ्यासाठी फेकीत जा !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.9923847269
--------------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न
24फेब्रुवारी2003
-----------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#क्रिकेट_विश्वकप_स्पेशल
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
--------------------------------
आपल्या सर्वांचे आभार.
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://suryakantdolase.blogspot.com/

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...