Friday, March 17, 2023

उठा- ठेव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

उठा- ठेव

तुम्ही मला सी.एम.बनवले,
मी तुम्हाला पी.एम. बनवतो आहे.
उपकाराची फेड उपकाराने,
हाच अर्थ याच्यात जाणवतो आहे.

कुणाला हे साटेलोटे वाटते.
कुणाला ही राजकीय देवघेव वाटते.
जे याकडे बारकाईने बघतात,
त्यांना तर ही नसती उठठेव वाटते.

राजकारणात कधी काय होईल?
याचे अंदाज कुणाच्या गावी आहेत?
नसती उठाठेव खरी असली तरी,
ते तर आधीपासूनच भावी आहेत!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8202
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17मार्च2023
 

Thursday, March 16, 2023

संपाची तिसरी बाजू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपाची तिसरी बाजू

दोघांच्या भांडणात,
तिसऱ्याचा तोटा असतो.
कोणत्याही संपाचा
हाच मोठा घाटा असतो.

दोन्हीकडूनही ताणले जाते,
तिसऱ्या वरती आणले जाते!
ज्याचे जळते त्यालाच कळते,
वर असेच मानले जाते.

हाती सत्ता असली की,
तिला संपाचा शाप आहे !
सत्ताधाऱ्यांनी सिद्ध करावे,
सरकार हे मायबाप आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8201
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16मार्च2023
 

संपु दे...संप सारे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपु दे...संप सारे..

आमदार खासदारांची पेन्शन,
सामान्य जनतेला सलते आहे.
सामान्य जनतेचे टेन्शन,
मोठ्या रागा रागाने बोलते आहे.

कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनची,
प्रत्येक सरकारला चिंता आहे.
जुन्या पेन्शनच्या वादावादीत,
भरडलेली सामान्य जनता आहे.

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे,
समजू नये फक्त बडगा आहे !!
दोन पावले पुढे,दोन पावले मागे,
हाच खरा संपावरचा तोडगा आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6749
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16मार्च2023
 

Wednesday, March 15, 2023

संपाचा पंचनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संपाचा पंचनामा

संप कुणाचाही असला तरी,
त्याच्यामध्ये आक्रमक चतुरी असते.
जशी वाटाघाटी, दबाव तंत्र असते,
तशी संपात हमखास फितुरी असते.

जसे काही संप नियोजित असतात,
तसे काही संप आयोजित असतात.
शंका आणि कुशंकांना वाव देणारे,
काही काही संप प्रायोजित असतात.

संपात राजकारण शिरले की,
फंद फितुरीही मुत्सद्दीपणा ठरतो!
बेरजेच्या राजकारणात मग,
खरा प्रश्नच गौण आणि उणा ठरतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6747
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15मार्च2023
 

सत्तेचे शहाणपण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्तेचे शहाणपण

जशी सत्ता असून अडचण,
तशी सत्ता नसून खोळंबा होते.
नेमकी पातळी दाखवणारी,
सत्ता म्हणाजे ओळंबा होते.

जसा ओळंबा कधीच कुणाला,
थोडीही लेवल सोडून देत नाही !
तसा सत्तेशिवाय शहाणपणा,
कधी कुणाला समजून येत नाही.

त्यामुळेच सत्ता जशी माजवते,
तशीच सत्ता लाजवत असते !
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनाही,
सत्ताच नेहमी गाजवत असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8200
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15मार्च2023
 

Tuesday, March 14, 2023

इज्जत का सवाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

इज्जत का सवाल

कालपर्यंत सरळ चालणारे,
आज चक्क स्पायरल होत आहेत.
त्यामुळेच एकमेकांच्या इज्जती,
मीडियावरती व्हायरल होत आहेत.

नको त्यांची, नको नको तिथे,
नको तशी तशी सर्फिंग आहे.
आपले आंबट शौक पुरविताना,
हवी तशी व्हिडिओ मॉर्फिंग आहे.

आता परस्परांच्या हातामध्येच,
परस्परांची सगळी इज्जत आहे!
कॉपी फॉरवर्ड करणाऱ्यांना तर,
बोटे घालण्यातच लज्जत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6747
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14मार्च2023
 

नाटू...नाटू....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
नाटू...नाटू....
जगात जिकडे बघावे तिकडे,
सध्या फक्त नाटू नाटू लागले आहे.
बॉलीवूडसह टॉलीवूडचेही कौतुक,
आता ऑस्करला वाटू लागले आहे.
व्हिस्परत व्हीस्परत का होईना,
आपला हत्ती तर पुढे गेला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे शेपूट
आता मागे राहणार नाही,
हा नवा आत्मविश्वास आला आहे.
कुणाला आहे ऑस्करचा दुस्वास,
कुणी ऑस्कर बाहुलीसाठी हट्टी आहे!
सध्यातरी चित्रपटांच्या विश्व विजयाची,
ऑस्करच युनिव्हर्सल मोजपट्टी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8199
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14मार्च2023
----------------------------------
मराठी वात्रटिका

Monday, March 13, 2023

प्रॅक्टिकलची थिअरी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

प्रॅक्टिकलची थिअरी

सत्तेसाठी फोडाफोडी म्हणजे,
आपल्या लोकशाहीला बट्टा आहे.
मंत्रीपदासाठीच्या तडजोडी म्हणजे,
कुणा कुणासाठी मात्र सट्टा आहे.

सट्टा म्हणजे राजकीय रिस्क आहे,
सट्टा म्हणजे जुगार किंवा मटका नाही.
एकदा आकड्यांचा संगम झाला की,
मग रिस्क घेतल्याचाही फटका नाही.

त्यांनीच केलेल्या प्रॅक्टिकलला,
त्यांनीच मांडलेली ही थेअरी आहे!
राजकीय आकडेशास्त्र ऐकून,
कल्याण आणि मुंबईला घेरी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6746
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13मार्च2023
 

Sunday, March 12, 2023

लाचारोत्सव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लाचारोत्सव

लाचारांकडून लाचार उत्सव,
आजकाल दणक्यात साजरे आहेत.
जे लाचार उत्सवात सहभागी,
ते सगळे हुजरे आणि मुजरे आहेत.

जेवढे ते हुजरे आणि मुजरे आहेत,
त्याहून जास्तच ते बिनलाजरे आहेत!
ते राखतात लाचारीची बूज,
म्हणूनच ते पट्टीचे बुजरे आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8198
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12मार्च2023
 

जातीय गुणधर्म..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------

जातीय गुणधर्म

कुणाला जात मिरवायला आवडते,
कुणाला जात फिरवायला आवडते.
जात कोणतीही असली तरी,
तिला जातीची जिरवायला आवडते.

कुणी कुणी करतो जातीचा प्रचार,
कुणाला वाटते जात प्रचारू नये.
जसे कुणाला वाटते जात विचारू नये,
तसे कुणाला वाटते जात आचारू नये.

कुणाला जात प्रगतीचा मार्ग वाटतो,
कुणाला मात्र जात हा अडसर वाटतो!
जात जातीने जोपासली जाते तरी,
कुणी जात्यांध आणि वेडसर वाटतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6745
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12मार्च2023

 

Saturday, March 11, 2023

ईडी ईडीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 आजची वात्रटिका
------------------------

ईडी ईडीचा खेळ

आजकाल लहान लहान पोरांचे,
खेळही आता छळायला लागले.
आजकाल लहान मुले सुद्धा,
चक्क ईडी ईडी खेळायला लागले.

यांची त्यांच्यावर धाड आहे,
त्यांची यांच्यावर धाड आहे.
चौकशीनंतर आम्हांला कळाले,
जो टीममध्ये येतो,त्याचालाड आहे.

पोरांचा चालला पोरखेळ,
त्यांच्या नियमांचाही वीट आहे !
जो आपल्या टीम मध्ये येईल,
तोच नाबाद,वर क्लीन चीट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6744
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11मार्च2023


लॉजिकल विचार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लॉजिकल विचार

राजकारणात असते जादूची कांडी,
कारण राजकारण हे मॅजिक आहे.
दरवेळी बदलत्या भूमिकांचे,
दर वेळीच नवे नवे लॉजिक आहे.

जसे ते मॅजिकली पटत नाही,
तसेच ते लॉजिकलीही पटत नाही!
रेटणारे पाहिजे ते लॉजिक रेटतात,
तसे रेटणारालाही ते खरे वाटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8197
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11मार्च2023
 

Friday, March 10, 2023

आंधळी कोशिंबीर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

आंधळी कोशिंबीर

तिला दिवसभर पुजून होते,
तिला दिवसभर भजून होते.
तिच्या किर्तनाची कॅसेट,
अगदी दिवसभर वाजून होते.

तीही याला भुलत जाते,
तीही त्यामुळे फुलत जाते.
तुम्ही जसे घुलवाल,
तशी तिही त्याला घुलत जाते.

तिच्याबरोबर सर्वांनाच,
सगळा प्रकार कळला जातो!
दरवर्षीच्या आठ मार्चला,
हाच खेळ पुन्हा खेळला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8196
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10मार्च2023
 

अर्थसंकल्प आणि विरोधक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अर्थसंकल्प आणि विरोधक

असे मुळीच नाही की,
हे कुणाच्या लक्षात आले नाही.
अर्थसंकल्पाचे स्वागत कधी,
कोणत्याच विरोधकांनी केले नाही.

संकल्पाचा अर्थ कसा लावायचा?
विरोधकांचे आधीच ठरलेले असते!
पूर्वग्रहदूषित प्रतिक्रिया द्यायचे,
एवढेच काय ते हाती उरलेले असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6743
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10मार्च2023
 

Thursday, March 9, 2023

नॅकांकन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नॅकांकन

सांगतो ती खबर ऐकून,
कुणी ख्याक ख्याक करू नका.
गुणवत्तेचा टेंभा मिरवीत,
उगीच कुणी नॅक नॅक करू नका.

नॅकचा बाजारभाव ऐकून
जाग्यावरच पॅक होवू शकता.
मानांकनाच्या सावळ्या गोंधळाने,
जाग्यावरच क्रॅक होऊ शकता.

पोत्यांच्या स्वच्छतागृहापासूनच,
नॅक मानांकन मनात खुपत आहे !
तरीही जो खोटे बोलेल त्याला,
विद्या आणि पिठाची शपथ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6742
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9मार्च2023
----------------------------------
मराठी वात्रटिका
 

Tuesday, March 7, 2023

जागते रहो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
जागते रहो
सवंग आणि उथळ असत्य,
अगदी वर्षानुवर्षे उफणली जातात.
ऐतिहासिक सत्य मात्र,
काळाच्या आड दफनली जातात.
दफनलेल्या ऐतिहासिक सत्यांना,
कशामध्ये तरी गुंडाळले जाते.
काखेत कळसा ठेवून मग,
त्या सत्याला गावभर धुंडाळले जाते.
प्रस्थापित असत्यच मग,
उजळ माथ्याने फिरवली जातात !
सत्याग्रही आणि सत्यशोधक,
अधर्मी आणि पापी ठरवली जातात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6741
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7मार्च2023
7मार्च2023

 

देशी म्हणाली विदेशीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

देशी म्हणाली विदेशीला

तुझ्यात आणि माझ्यात
सांस्कृतिक ऐक्याचे बंधन आहे.
कधी असते निमित्त गटारीचे,
कधी निमित्ताला धुलीवंदन आहे.

कधी कधी असतो जयघोष,
जियो और जिने दो.
गटारीला आणि धुलीवंदनाला,
पियो और पिने दो.

विदेशी विदेशी म्हणून,
तू उगीच लाजत जावू नकोस !
आत्मनिर्भर भारताचे डोस,
पेताडाना पाजत जावू नकोस !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8195
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7मार्च2023
 

Monday, March 6, 2023

जत्रा ते यात्रा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

जत्रा ते यात्रा

ज्यांना कुणाला वाटते भीती,
ज्यांना कुणाला वाटते खतरा आहे.
त्यांचीच चाललेली पायपीट,
त्यांचीच जत्रा आणि यात्रा आहे.

राजकीय यात्रा आणि जत्रात,
जसे हौशे आणि नवशे आहेत !
जे साधतात नेमक्या संध्या,
असे महाबिलंदर गवशे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8194
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6मार्च2023
 

सत्कारनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्कारनामा

भामट्यांकडून भामट्यांचे,
चालले सत्कार आज इथे.
वाघांच्या डरकाळ्या ठरतात,
घुबडांचे घुत्कार आज इथे.

अस्तनीतल्या नागांचेच,
चालले फुत्कार आज इथे.
नालायकांसाठी लायकांचे,
चालले धुत्कार आज इथे.

जरी दबलेल्या आवाजाचे,
उठती चित्कार आज इथे!
तरी मिंध्यांकडून मिंध्यांचेच
जाहीर सत्कार आज इथे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6740
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6मार्च2023
 

Sunday, March 5, 2023

उलटी रीत,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
उलटी रीत
खोटी आपुलकी,खोटा उमाळा;
यांना तर अगदीच बहर आहे.
त्याला प्रोत्साहन,त्यालाच किंमत,
सगळा खोटेपणाचा कहर आहे.
साटेलोटे हा व्यवहार झाला,
दिखावू व्यवहार विकावू झाले.
जे जे काही टाकावू आहे,
ते तेच तर आज टिकावू झाले.
जे जे काही विकावू आहे,
त्याची तर  सर्वत्र चलती आहे !
दुनियेची ही उलटी रीत,
संवेदशीलतेलाच सलती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8193
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5मार्च2023

 

बुरा न मानो.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बुरा न मानो.....

लोकांना बोंबलायलाच लावायचे,
असेच जणू ठराव होत असतात.
एका दिवसाच्या शिमग्याचे,
जणू वर्षभर सराव होत असतात.

कधी सुलट्या,नेहमीच उलट्या,
बोंबावर बोंबा ठोकल्या जातात.
बोंबा ऐकण्याच्या सरावामुळे,
वाट्टेल त्या गोष्टी धकल्या जातात.

कधी यांच्या तर कधी त्यांच्या,
सत्तेवरती पक्षीय टोळ्या असतात!
बारा महिने तेरा त्रिकाळ,
जनतेच्या अपेक्षांच्या होळ्या असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6739
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5मार्च2023
 

Saturday, March 4, 2023

मोबाईल कॉपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मोबाईल कॉपी

जसे पूर्वीही पेपर फुटायचे,
तसे आताही पेपर फुटू लागले.
मोबाईलचे नवे पंख,
आता पेपरलाही भेटू लगले.

झेरॉक्स सेंटरवरचे कॉपी-पेस्ट,
आता मोबाईलवर होऊ लागले.
त्यामुळे पहिल्यापेक्षा जास्त भाव,
आता फुटलेले पेपर खाऊ लागले.

त्यामुळेच तर कॉप्यांचाही,
आता जोरात सुळसुळाट आहे !
परीक्षेपूर्वी फुटलेल्या पेपरला,
गुणवंतांचा तळतळाट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8192
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4मार्च2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...