Monday, October 28, 2024

दैनिक वात्रटिका l 28ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 150 वा

 


दैनिक वात्रटिका l 28ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 150 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

वेटिंग गेम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वेटिंग गेम

इकडेही अगदी सेम आहे,
तिकडेही अगदी सेम आहे.
जिकडे बघावे तिकडे,
प्रत्येकाचाच वेटिंग गेम आहे.

कुणी सेटिंग लिस्टवर आहेत,
कुणी वेटिंग लिस्टवर आहेत.
कुणी चिटिंग लिस्टवर तर,
कुणी कटिंग लिस्टवर आहेत.

पक्ष आणि उमेदवारांच्याही,
बुडाखाली ब्लास्टिंग आहे !
पक्ष आणि उमेदवारांच्याही,
वेटिंग गेमची ही टेस्टिंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8725
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28ऑक्टोबर 2024
 

Sunday, October 27, 2024

दैनिक वात्रटिका l 27ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 149 वा

दैनिक वात्रटिका l 27ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 149 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

संन्यासाची ऐशी तैशी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संन्यासाची ऐशी तैशी

राजकीय संन्यास घेणारेही,
निवडणुकीत उतरू लागले.
गुंडाळलेला बाड - बिस्तरा,
पुन्हा नव्याने हातरू लागले.

निवडणुकीतल्या राजकारणाचा,
त्यांचा संन्यास खोटा निघाला.
ज्यांच्यावर होती लोकांची श्रद्धा,
तोसुद्धा नर्मदेचा गोटा निघाला.

राजकीय संन्यासाची घोषणा,
हासुद्धा राजकीय डाव आहे !
आपल्या राजकीय कंडाला,
लोक आग्रहाचे नवे नाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8724
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27ऑक्टोबर 2024
 

Saturday, October 26, 2024

दैनिक वात्रटिका l 26ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 148 वा


दैनिक वात्रटिका l 26ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 148 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

अशी ही तिकिटाची तऱ्हा ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अशी ही तिकिटाची तऱ्हा

इतरत्र तिकिटानंतर प्रवेश असतो,
येथे प्रवेशानंतर लगेच तिकीट आहे.
काल ज्यांना घातल्या शिव्या,
त्यांनाच गरजेपोटी क्लीन चिट आहे.

निवडणुकीच्या राजकारणाची,
अगदीच उलट सुलट तऱ्हा आहे.
इनकमिंग-आउट गोइंगवाल्यांचाही,
जिकडे बघावे तिकडे तोरा आहे.

घरचे झाले थोडे;व्याह्याचे आले घोडे,
ही म्हणसुद्धा सार्थ ठरते आहे !
कानामागून आले तिखट झाले,
ही म्हणसुद्धा आग आग करते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8723
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26ऑक्टोबर 2024
 

Friday, October 25, 2024

दैनिक वात्रटिका l 25ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 147 वा


दैनिक वात्रटिका l 25ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 147 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बुद्रुक आणि खुर्द....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

बुद्रुक आणि खुर्द

खुर्द विरुद्ध बुद्रुक आहेत,
बुद्रुक विरुद्ध खुर्द आहेत.
ज्यांना त्यांना वाटत आहे,
फक्त ते स्वतःच मर्द आहेत.

कोण बुद्रुक? कोण खुर्द?
दाव्यावरती प्रतिदावे आहेत.
तेच शेर;तेच सव्वाशेर,
काव्यावरती प्रतिकावे आहेत.

ज्या गावच्या बाभळी,
त्याच गावच्या बोरी आहेत !
आत्मविश्वासाचे हुंकार,
बुद्रुक आणि खुर्दच्या उरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8722
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25ऑक्टोबर 2024

Thursday, October 24, 2024

दैनिक वात्रटिका l 24ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 146 वा


दैनिक वात्रटिका l 24ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 146 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

विरोधाभास ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विरोधाभास

सामान्य मतदार राजा,
एकाच उत्तराच्या शोधात आहे.
अजूनही त्याला कळेना?
कोण कुणाच्या विरोधात आहे?

मतदार राजा समोर उभा,
सगळाच विरोधाभास आहे.
त्याच्या लोकशाही कल्पनेचा,
सगळीकडूनच सत्यानाश आहे.

मतदार राजाला कुणीतरी सांगा,
आजची तर फक्त झाकी आहे !
लोकशाहीचा खरा तमाशा,
अजून तरी बाकी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,

-------------------------------
फेरफटका-8721
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24ऑक्टोबर 2024
 

Wednesday, October 23, 2024

दैनिक वात्रटिका l 23ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 145 वा


दैनिक वात्रटिका l 23ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 145 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

संगीत खुर्ची ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संगीत खुर्ची

आम्ही खरे बोललो की,
त्यांच्या नाकाला मिरची आहे.
आजकालचे राजकारण म्हणजे,
जणू काही संगीत खुर्ची आहे.

सत्तेच्या खुर्चीसाठीच,
सगळे काही रंगीत संगीत आहे.
निष्ठा - बिष्ठा सगळे काही,
जो तो खुंटीला टांगीत आहे.

सर्वच घुसखोरांच्या कानामध्ये,
आज बंडखोरीचा वारा आहे !
खुर्चीसाठी वाटेल ते...
सगळ्यांचा सारखाच नारा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका-8720
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23ऑक्टोबर 2024
 

Tuesday, October 22, 2024

दैनिक वात्रटिका l 22ऑक्टोबर2024 वर्ष- चौथे lअंक - 144 वा


दैनिक वात्रटिका l 22ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 144 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

पारंपरिक सत्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पारंपरिक सत्य

कुणाच्या लेकीला;कुणाच्या लेकाला,
कुणाच्या बहिण आणि भावाला आहे.
उमेदवारांची यादीच सांगते,
आपली लोकशाही फक्त नावाला आहे.

कोणत्याही पक्षाची यादी काढा,
तिथे हीच गोष्ट ठळक दिसते आहे.
लोकशाहीच्या उरावर घराणेशाही,
दर निवडणुकीलाच बसते आहे.

घरा-दारात वाटून झाले की,
सगे सोयऱ्यांचीही सोय लावली जाते !
आपली लोकशाही सुद्धा,
त्यांच्या घराणेशाहीला पावली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका-8719
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22ऑक्टोबर 2024
 

Monday, October 21, 2024

दैनिक वात्रटिका l 21ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 143वा

दैनिक वात्रटिका l 21ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 143वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

उमेदवारीची किंमत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीची किंमत

उमेदवारी मिळालेले निष्ठावान,
नाकारलेले बंडखोर ठरले जातात.
जे कुणी अन्याय सहन करतात,
ते अगदीच गृहीत धरले जातात.

कुणाला उमेदवारीचा धक्का,
कुुणाचा पत्ताच कापला जातो.
पक्षीय असमतोल कायम ठेवून,
बाकीचा समतोल जपला जातो.

कितीही समतोल राखला तरी,
पक्षीय राजकारण डळमळू लागते !
प्रत्येकाच्या उमेदवारीची किंमत,
प्रत्यक्ष निकालानंतरच कळू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8718
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21ऑक्टोबर 2024
 

Sunday, October 20, 2024

दैनिक वात्रटिका l 20ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 142वा l

दैनिक वात्रटिका l 20ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 142वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

बोगस मतदार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बोगस मतदार

बोगस मतदार तर,
प्रत्येक बुथवर भेटू लागले.
बोगस मतदान करणे,
मतदारांना शौर्य वाटू लागले.

बोगस मतदान करण्यात,
ज्याचा त्याचा हात आहे.
लोकशाहीबरोबर स्वतःचाही,
हा चक्क आत्मघात आहे.

बोगसगिरीत गंमत आहे,
बोगसगिरीत हिंमत आहे !
बोगसपणा कुठलाही असो,
त्याची एक किंमत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8717
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20ऑक्टोबर 2024
 

Saturday, October 19, 2024

daily vatratika...19octo2024


दैनिक वात्रटिका l 19ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 141वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बंडखोरांचा बोलबाला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बंडखोरांचा बोलबाला

बंडखोरांचे स्वागत आहे...
बंडखोरांचे स्वागत आहे...
सगळ्याच पक्षीय कार्यकर्त्यांना,
हीच घोषणा द्यावी लागत आहे.

नाराज आणि बंडखोरांना,
जसे अनेक ऑप्शन खुले आहेत.
तसे पक्षीय इनकमिंग मुळे मात्र,
निष्ठावंत नाराज झाले आहेत.

अनेक ऑप्शन खुले असल्याने,
बंडखोरीला उत आला आहे !
गेलेले बंडखोर;आलेले बंडखोर,
बंडखोरांचाच बोलबाला आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8716
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19ऑक्टोबर 2024
 

Friday, October 18, 2024

दैनिक वात्रटिका l 18ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 140 वा l


दैनिक वात्रटिका l 18ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 140 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

राजकीय त्याग ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय त्याग

आपल्या राजकीय त्यागाची,
त्याला त्याला चर्चा करणे भाग आहे.
ज्या ज्या केल्या तडजोडी,
तो म्हणे त्यांचा राजकीय त्याग आहे.

राजकीय त्यागाचे राजकीय भोगाशी,
वास्तवात तर अनैतिक संबंध आहेत.
डोळे मिटलेल्या मांजराला वाटते,
आसपासचे सगळे लोकच अंध आहेत.

आपल्या भोगाचे त्यागात,
अनैतिक असे उदात्तीकरण आहे !
कुणाचा त्याग मोठा?कुणाचा छोटा?
निवडीत बसण्याचे काय कारण आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8715
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18ऑक्टोबर 2024

अज्ञानातला आनंद ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अज्ञानातला आनंद एकदा भावना भडकल्या की, वास्तवाचेही भान राहत नाही. आपण निव्वळ अज्ञानी आहोत, याचेह...