Friday, February 7, 2020

कोरोना इफेक्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कोरोना इफेक्ट
चिकन मटण विक्रेत्यांना
कोरोना व्हायरसचा झटका आहे.
व्हायरल झालेल्या अफवांचा,
जगभरात मोठा फटका आहे.
अफवांच्या व्हायरसचा वेग,
कोरोनापेक्षाही फास्ट आहे !
आयता प्रचार होऊ लागला,
शाकाहारच सर्वश्रेष्ठ आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5708
दैनिक पुण्यनगरी
7फेब्रुवारी 2020

Thursday, February 6, 2020

ट्रीपल पॉवर

आजची वात्रटिका
----------------------------------------
ट्रीपल पॉवर
जुन्याच मुद्द्याला
पुन्हा नव्याने हवा आहे.
आजोबा पंतप्रधान होतील,
आता नातवाचाही दावा आहे.
पाठीशी आकडे नसले तरी,
त्यांचा सर्वपक्षीय वावर आहे !
आता तर पाठीशी,
चक्क 'ट्रीपल पॉवर 'आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5707
दैनिक पुण्यनगरी
6फेब्रुवारी 2020

नामी उपाय

आजची वात्रटिका
----------------------------------------
नामी उपाय
याचे बघून त्याला,
त्याचे बघून याला चेव आहे.
सरकारनियुक्त पदाधिकाऱ्याच्या,
राजीनाम्यांचे पेव आहे.
काल भोगलेल्या पदाची
आता कुठे हमी आहे ?
हकालपट्टीपेक्षा राजीनामा देणे,
हा उपायच नामी आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7199
दैनिक झुंजार नेता
6फेब्रुवारी2020

Wednesday, February 5, 2020

प्रेमाची कसोटी

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रेमाची कसोटी
जनावराला माणूस बनविण्याची,
खऱ्या प्रेमामध्ये जादू आहे.
माणसाला जे जनावर बनविते,
ते प्रेम विकृत आणि अधू आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो,
तू माझ्यावर प्रेम कर,
असे कुणाला छळू-बिळू नका.
नकारही स्विकारायला शिका,
कुणाला जाळू-बिळू नका.
खरे प्रेम जाळायला नाही,
प्रेम जळायला शिकवित असते !
जाच आणि आच पचवित
प्रेम पोळायला शिकवित असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7198
दैनिक झुंजार नेता
5फेब्रुवारी2020

मंत्रोपचार

आजची वात्रटिका
----------------------------------------
मंत्रोपचार
बडे बडे धर्मपंडीत
डॉक्टर व्हायला लागले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी,
मंत्रोपचार द्यायला लागले.
ज्याचा त्याचा उपचार,
ज्याला त्याला लखलाभ आहे !
कोरोना व्हायरसएवढीच,
ही चिंताजनक बाब आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5706
दैनिक पुण्यनगरी
5फेब्रुवारी 2020

जन्मतारीख

आ।ठ।व।णी।ती।ल वा।त्र।टि।का
-------------------------------------------
जन्मतारीख:एक संवाद
मॉंसाहेब,
आम्ही असलो छत्रपती,
तरी आम्हांला आता भिती आहे.
तुम्हीच आठवून सांगा,
आमची जन्मतारीख किती आहे?
शिवबा,तुमची जन्मतारीख
आम्ही मुद्दाम सांगत नाहीत.
इथले इतिहाचार्य,बुद्धिवादी
राजकारण्यांची
अब्रु वेशीला टांगत नाहीत.
राजांची भिती,
मॉंसाहेबांची इच्छा,
आता आता आम्हांला कळत आहे !
कुत्र्याने पीठ खाऊनसुद्धा
आंधळे पुन्हा पुन्हा दळत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-45
दैनिक झुंजार नेता
17फेब्रुवारी2000

Tuesday, February 4, 2020

महापुरुषांची दुर्दशा

आजची वात्रटिका
----------------------------------------
महापुरुषांची दुर्दशा
महापुरुषांच्या नावावर
आपापले दुकान थाटले गेले.
जाती आणि धर्मामध्ये,
सर्व महापुरुष वाटले गेले.
कधीही होवू नये अशी,
महापुरुषांची दुर्दशा झाली आहे !
आज फक्त जात आणि धर्मच,
महापुरुषांचा वाली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7197
दैनिक झुंजार नेता
4फेब्रुवारी2020

निष्ठेचा सिद्धांत

आजची वात्रटिका
----------------------------------------
निष्ठेचा सिद्धांत
एखादं दुसऱ्या दर्शनाने
देव काही वृध्द होत नाही.
पुन्हा पुन्हा दाखविल्याशिवाय
निष्ठा सिद्ध होत नाही.
संधी मिळेल तिथे
निष्ठादर्शनाची खाज असते !
आपली निष्ठा दाखविताना,
कुठे कुणाला लाज असते?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7196
दैनिक झुंजार नेता
3फेब्रुवारी2020

वाचाळांची जुगलबंदी

आजची वात्रटिका
----------------------------------------
वाचाळांची जुगलबंदी
वाचाळ आणि महावाचाळ
यांची जणू जुगलबंदी आहे.
तिथे तिथे जीभ टाळ्याला,
जिथे जिथे संधी आहे.
कुणी माप काढतो आहे,
कुणी बाप काढतो आहे !
एकमेकांचे बघून वाचाळांचा,
प्रतापावर प्रताप वाढतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5705
दैनिक पुण्यनगरी
4फेब्रुवारी 2020

Monday, February 3, 2020

सत्यामागचे सत्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
सत्यामागचे सत्य
सत्य म्हणून असत्यच,
वेगाने व्हायरल होत आहे.
कसलेही आढेवेढे न घेता,
अर्धसत्य स्पायरल होत आहे.
अर्धसत्य आणि असत्य
यांचाच मोठा सेल आहे !
सत्याचा विजय होणारच,
पण सध्या तरी ते फेल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5704
दैनिक पुण्यनगरी
3फेब्रुवारी 2020

Sunday, February 2, 2020

इमानदारीच्या 'आय' ला.....

आजची वात्रटिका
----------------------------------------
इमानदारीच्या 'आय' ला.....
कुठे प्रत्यक्ष, कुठे अप्रत्यक्ष
टॅक्स भरला जातो.
इमानदारांचा खिसा,
डोळ्यादेखत मारला जातो.
जिकडे बघावे तिकडे,
नाकेच नाके आहेत !
इमानदारीच्या 'आय' ला,
टॅक्सचे खरे धोके आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
फेरफटका-7195
दैनिक झुंजार नेता
2फेब्रुवारी2020

गॅदरींगचे 'गुण' दर्शन

आजची वात्रटिका
----------------------------------------
गॅदरींगचे 'गुण' दर्शन
पुन्हा जुनेच पाढे
नव्याने वाचायला लागले.
आयटम सॉंगच्या तालावर
विद्यार्थी नाचायला लागले.
जणू विविध गुणदर्शनाला
एकमेव पर्याय हाच आहे.
चिल्लर चिल्लर विद्यार्थ्यांचा
थिल्लर थिल्लर नाच आहे.
पालक आणि शिक्षकांना
कळायला आणि वळायला हवे !
अचकट विचकट गुणदर्शन,
जाणिवपूर्वक टाळायला हवे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5703
दैनिक पुण्यनगरी
2फेब्रुवारी 2020

Saturday, February 1, 2020

सुपर ओव्हर

आजची वात्रटिका
----------------------------------------
सुपर ओव्हर
आजकाल जरा जास्तच,
ट्वेन्टी-ट्वेन्टी चा फिव्हर आहे.
टाय-टाय फिश करण्यासाठी,
सतत 'सुपर ओव्हर' आहे.
क्रिकेट आणि वेळेचे,
अपव्यय टाळले पाहिजेत !
टाईमपास करण्यापेक्षा,
'सुपर ओव्हर' च खेळले पाहिजेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5699
दैनिक पुण्यनगरी
1फेब्रुवारी 2020

चायना माल

आजची वात्रटिका
----------------------------------------
चायना माल
कोरोना व्हायरसची
मोठ्या वेगाने वाटचाल आहे.
आता खात्री पटू लागली,
हा तर 'चायना माल' आहे.
एकदा 'चायना माल' म्हटले की,
त्याची वॉरंटी ना गॅरंटी आहे !
आपलीच लाल करताना,
चीनसाठीही धोक्याची घंटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7194
दैनिक झुंजार नेता
1फेब्रुवारी2020

Friday, January 31, 2020

सरकारी पुरस्कार


व्हायरस इन्फेक्शन

आजची वात्रटिका
----------------------------------------
व्हायरस इन्फेक्शन
व्हायरसवर व्हायरसची,
वरचेवर भर आहे.
जात,धर्म,भाषा,प्रांतांच्या,
व्हायरसला कुठे मर आहे?
व्हायरसच्या इन्फेक्शनचे
परिणाम खूप दाहक आहेत.
मोठा धोका असा की,
माणसेच त्यांचे वाहक आहेत.
द्वेषवर्धक व्हायरसपासून,
माणुसकी वाचली पाहिजे !
जेंव्हा आणि जिथे टोचता येईल,
तिथे प्रेमाची लस टोचली पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5699
दैनिक पुण्यनगरी
31जानेवारी 2020

Thursday, January 30, 2020

राजे,चला तुम्हांला तुमचा महाराष्ट्र दाखवतो


गांधीबाबा



आजची वात्रटिका
----------------------------------------
गांधीबाबा
राष्ट्रपिता म्हणून
जशी तुमची कीर्ती आहे.
तसे तुमचे नाव,
मजबूरीशी समानार्थी आहे.
अहिंसेच्या लढ्याला,
सत्याग्रहाचा पाया आहे !
ज्यांना तुम्ही दुर्बल वाटता,
त्यांची खरोखर दया आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7192
दैनिक झुंजार नेता
30जानेवारी2020
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

विषबाधा

आजची वात्रटिका
----------------------------------------
विषबाधा
कुठली तरी भूल देऊन,
लोकांना भुलवले जाते.
लोकांच्या मनामध्ये
विष कालवले जाते.
त्यांच्या विषबाधेने,
लोकही बाधले जातात !
लोक शुद्धीवर येईपर्यंत
त्यांचे डाव साधले जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5698
दैनिक पुण्यनगरी
30जानेवारी 2020

Wednesday, January 29, 2020

शेम टू शेम

आजची वात्रटिका
----------------------------------------
शेम टू शेम
उलट सुलट भूमिका,
सारख्या सारख्या घेऊ लागले.
एकमेकांच्या फिरक्या घेणारे,
आता गिरक्या घेऊ लागले.
फिर फिर फिरक्या आहेत,
गिर गिर गिरक्या आहेत !
सगळ्यांच्या तऱ्हासुद्धा
सारख्याला वारख्या आहेत!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7191
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी2020
----------------------------------------

चाय पे चर्चा

आजची वात्रटिका
----------------------------------------
शेम टू शेम
उलट सुलट भूमिका,
सारख्या सारख्या घेऊ लागले.
एकमेकांच्या फिरक्या घेणारे,
आता गिरक्या घेऊ लागले.
फिर फिर फिरक्या आहेत,
गिर गिर गिरक्या आहेत !
सगळ्यांच्या तऱ्हासुद्धा
सारख्याला वारख्या आहेत!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7191
दैनिक झुंजार नेता
29जानेवारी2020

Tuesday, January 28, 2020

जय संतोषी माता

आजची वात्रटिका
----------------------------------------
जय संतोषी माता
पोस्टकार्डवरची संतोषीमाता,
सोशल मीडियावर आली.
सोळा शुक्रवारची कहाणी,
मोबाईलवरून व्हायरल झाली.
जुन्याच जळमटांना,
नव्या तंत्रज्ञाची पॉलिश आहे !
कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्डचा,
खेळच अगदी बालीश आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...