Friday, December 16, 2022
विकास दर्शन... मराठी वात्रटिका
जरा सबुरीने घ्या... मराठी वात्रटिका
-----------------------
जरा सबुरीने घ्या...
येडपटांना येडपट राहू द्या,
त्यांना शहाणपणा शिकवू नका.
गेंडे एकाएकी कोमल झालेत,
कुणी त्यांच्या भावना दुखवू नका.
गेंड्यांची कातडी ज्यांची,
त्यांच्यासाठी आतडे तोडू नका.
चमत्काराला करती नमस्कार,
त्यांना चुकूनही उघडे पाडू नका.
अज्ञान आणि अंधश्रद्धेतच,
ज्यांचा ज्यांचा आनंद साठला आहे!
त्या अंधारप्रेमींना प्रकाश दाखवणे,
सांगा हा तरी न्याय कुठला आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6663
दैनिक पुण्यनगरी
16डिसेंबर2022
---------------------------------------
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
Thursday, December 15, 2022
जैसे थे !.... मराठी वात्रटिका
जखमी स्वातंत्र्य... मराठी वात्रटिका
Wednesday, December 14, 2022
गावकारण... मराठी वात्रटिका
मचाळा.... मराठी वात्रटिका
दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...





