Monday, April 13, 2009

माझा अल्बम

माझा अल्बम

दिसतो त्यापेक्षाही
तो जास्तच ’ प्रवीण’ निघाला
अल्बमचा प्रताप तर
सगळ्यापेक्षा नवीन निघाला.

सख्खा भाऊ पक्का वैरी
हा तमाशाचा वग आहे.
बघायला टपलेले
इथे सारे जग आहे.

म्रुत्यू तर अटळ आहे,
तो कुणालाच चुकला नाही !
इथे तर प्रत्यक्ष म्रुत्यूही
वैराला टाळू शकला नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

daily vatratika...11april2025