गुन्हेगार म्हटल्याने
शेतकर्यांची मान झुकली जाईल.
अफूची शेती कायदेशीर केल्याने
एकच खसखस पिकली जाईल.
बोलून चालून आंतरपिक
पैसाही घसघशीत आहे !
पापी पोटाचा सवाल
रानातल्या खसखशीत आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, February 29, 2012
लुटारू म्हणाला बलात्कार्याला
त्या केजरीवालने बघ
आपल्याला कुठे घुसवले आहे?
मागचा पुढचा विचार नाही
आपल्याला संसदेत बसवले आहे
कुणी कसली टीका करावी
आपली काही हुज्जत नाही !
आपल्याला नको तिथे बसवायला
आपल्याला काय इज्जत नाही?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आपल्याला कुठे घुसवले आहे?
मागचा पुढचा विचार नाही
आपल्याला संसदेत बसवले आहे
कुणी कसली टीका करावी
आपली काही हुज्जत नाही !
आपल्याला नको तिथे बसवायला
आपल्याला काय इज्जत नाही?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, February 28, 2012
नशेबाज कवी
नशेबाज कवी
कविता श्रोत्यांना नशा आणत
कवी नशेत झिंगलेले असतात.
तरी बरे कवितेचा वास येत नाही
श्रोते शब्दात रंगलेले असतात.
कवितेपेक्षा कवीच
कितीतरी नशिले असतात!
त्यांचीच मैफिल रंगते
ज्यांचे टेबलावरचे वशिले असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कविता श्रोत्यांना नशा आणत
कवी नशेत झिंगलेले असतात.
तरी बरे कवितेचा वास येत नाही
श्रोते शब्दात रंगलेले असतात.
कवितेपेक्षा कवीच
कितीतरी नशिले असतात!
त्यांचीच मैफिल रंगते
ज्यांचे टेबलावरचे वशिले असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, February 27, 2012
स्वाभिमानाची ऐशीतैशी
लाचारांची कमी नाही
स्वाभिमानाचे वांधे आहेत,
जिकडे बघावे तिकडे
सर्वत्र मिंधेच मिंधे आहेत.
कुणाचा मिंधेपणा उघड,
कुणाचा मिंधेपणा झाकलेला आहे!
कुणी आपला स्वाभिमान
नकटय़ांकडे गहाण टाकलेला आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
स्वाभिमानाचे वांधे आहेत,
जिकडे बघावे तिकडे
सर्वत्र मिंधेच मिंधे आहेत.
कुणाचा मिंधेपणा उघड,
कुणाचा मिंधेपणा झाकलेला आहे!
कुणी आपला स्वाभिमान
नकटय़ांकडे गहाण टाकलेला आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Sunday, February 26, 2012
धोनी विरुद्ध सेहवाग
भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी
हे चांगले वेध नाहीत,
कसा भरवसा ठेवावा?
खेळाडूंमध्ये मतभेद नाहीत.
धोनी असो वा कोणी असो
देशापेक्षा मोठा सेहवाग नाही !
विश्वविजेतेपदाचा नक्षा उतरला
तरीही कुणाला जाग नाही !!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
हे चांगले वेध नाहीत,
कसा भरवसा ठेवावा?
खेळाडूंमध्ये मतभेद नाहीत.
धोनी असो वा कोणी असो
देशापेक्षा मोठा सेहवाग नाही !
विश्वविजेतेपदाचा नक्षा उतरला
तरीही कुणाला जाग नाही !!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Saturday, February 25, 2012
बेहिशोबाचा हिशोब
आपण ओळखू शकतो
कोण किती लबाड आहे?
राजकारण्यांच्या घरात
सध्या किती घबाड आहे?
काल किती होते, आज किती आहे?
हिशोब अगदी सरळ आहे!
हजारो पट वाढले नसेल तर
आमचीही गरळ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कोण किती लबाड आहे?
राजकारण्यांच्या घरात
सध्या किती घबाड आहे?
काल किती होते, आज किती आहे?
हिशोब अगदी सरळ आहे!
हजारो पट वाढले नसेल तर
आमचीही गरळ आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, February 24, 2012
राजकीय ट्रिप्स
जे जे निवडून आले
त्यांची ट्रिप जाऊ लागते.
निवडणुकीनंतर राजकारण
खरी ग्रीप घेऊ लागते.
पक्षा-पक्षा एवढीच काळजी
राजकीय गटातटाला असते!
फोडाफोडी एवढीच फुटाफुटीची
भीती फुटा फुटाला असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, February 23, 2012
गुन्हेगार कोण?
आपण सहन केल्यानेच
गुन्हेगारांना स्फुरण येत आहे.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे
हेच तर कारण होत आहे.
उभे राहतात, निवडून येतात
हाच प्रकार पुन्हा पुन्हा आहे!
ते तर गुन्हेगार आहेतच
आपलाही मोठा गुन्हा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
गुन्हेगारांना स्फुरण येत आहे.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे
हेच तर कारण होत आहे.
उभे राहतात, निवडून येतात
हाच प्रकार पुन्हा पुन्हा आहे!
ते तर गुन्हेगार आहेतच
आपलाही मोठा गुन्हा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, February 22, 2012
एका कोटीची गोष्ट
कुणाला पैसा नको?
सगळ्यांनाच तो हवा आहे.
वाटलेल्याची गणती नाही,
एका कोटीचा गवगवा आहे.
सापडले त्याची चौकशी
सापडले नाही त्याचे काय आहे?
लोकशाही म्हणजे
कसायाच्या दावणीला गाय आहे!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, February 21, 2012
निवडणू्कीनंतचे हिशोब
निवडणूका संपल्या
मागे कवित्त्व उरू लागले.
निवडणू्कीनंतचे हिशोब
सगळेच चुकते करू लागले.
निवडणू्कीनंतरचा हिशोब
रक्तामध्ये रंगतो आहे !
हा सूडाचा प्रवास
सारे काही सांगतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मागे कवित्त्व उरू लागले.
निवडणू्कीनंतचे हिशोब
सगळेच चुकते करू लागले.
निवडणू्कीनंतरचा हिशोब
रक्तामध्ये रंगतो आहे !
हा सूडाचा प्रवास
सारे काही सांगतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
रामदासबोध
रामदासबोध
भगवा खांद्यावर घेऊनही
त्यांचे रंग उडले आहेत.
पराभवाच्या जहराने
ते काळे-निळे पडले आहेत.
पराभवाच्या जहरातही
एक वेगळीच नशा आहे!
राज्यसभेवरच्या खासदारकीची
मनोहर आशा आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
भगवा खांद्यावर घेऊनही
त्यांचे रंग उडले आहेत.
पराभवाच्या जहराने
ते काळे-निळे पडले आहेत.
पराभवाच्या जहरातही
एक वेगळीच नशा आहे!
राज्यसभेवरच्या खासदारकीची
मनोहर आशा आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, February 20, 2012
विजयाची जाहिरात
आपल्या नवरेशाहीचा अंहकार
जरी मनामध्ये जपला जातो.
तरी मोठ्या फुशारकीने
बायकोसोबत फोटो छापला जातो.
राजकीय महिला आरक्षणातही
नवरेशाहीचा फुत्कार असतो !
जिंकलेली असते बायको
मात्र नवर्याचा सत्कार असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
जरी मनामध्ये जपला जातो.
तरी मोठ्या फुशारकीने
बायकोसोबत फोटो छापला जातो.
राजकीय महिला आरक्षणातही
नवरेशाहीचा फुत्कार असतो !
जिंकलेली असते बायको
मात्र नवर्याचा सत्कार असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
उत्सवांचे सार्थक
फक्त तोंडी लावण्यापुरतेच
आपल्याला महापुरुष लागतात.
जयंत्या-मयंत्या करून
पुन्हा पाहिल्यासारखेच वागतात.
उत्सव पाहिजे, उत्साह पाहिजे,
डोक्यातही काहीतरी घेतले पाहिजे!
बोलणार्या सुपार्या घेतात
आपण मणभरातून
किमान कणभर तरी घेतले पाहिजे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आपल्याला महापुरुष लागतात.
जयंत्या-मयंत्या करून
पुन्हा पाहिल्यासारखेच वागतात.
उत्सव पाहिजे, उत्साह पाहिजे,
डोक्यातही काहीतरी घेतले पाहिजे!
बोलणार्या सुपार्या घेतात
आपण मणभरातून
किमान कणभर तरी घेतले पाहिजे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, February 19, 2012
शिवबाची शिवशाही
राजेशाहीचे नाव जरी
स्वराज्याची ग्वाही होती.
लोकशाहीस प्रेरणा देणारी
शिवबाची शिवशाही होती
स्वराज्य संकल्पक बाप,
दृढनिश्चयी आई होती.
आत्मभान जागविणारी
शिवबाची शिवशाही होती.
समता अन मानवतेची
रात्रंदिवस द्वाही होती.
सह्याद्रीचा माथा उंचविणारी
शिवबाची शिवशाही होती.
ना जातीभेद, ना धर्मभेद
प्रजानिष्ठा ठायी ठायी होती.
स्वामीनिष्ठेने भारलेली
शिवबाची शिवशाही होती
.
आत्मभानाची पेटती मशाल
जिथे स्वराज्याची घाई होती
शत्रूस चळाचळा कापविणारी
शिवबाची शिवशाही होती.
मातीस फाटाफुटीचा शाप,
जरी आपसात दुही होती.
त्या सर्वाना मिटविणारी
शिवबाची शिवशाही होती.
हे पडती शब्द अपूरे
याहूनही बरेच काही होती!
स्वातंत्र्याची गाथा रचणारी
शिवबाची शिवशाही होती!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
शिवबाची शिवशाही
राजेशाहीचे नाव जरी
स्वराज्याची ग्वाही होती.
लोकशाहीस प्रेरणा देणारी
शिवबाची शिवशाही होती
स्वराज्य संकल्पक बाप,
दृढनिश्चयी आई होती
आत्मभान जागविणारी
शिवबाची शिवशाही होती.
समता अन मानवतेची
रात्रंदिवस द्वाही होती.
सह्याद्रीचा माथा उंचविणारी
शिवबाची शिवशाही होती.
ना जातीभेद, ना धर्मभेद
प्रजानिष्ठा ठायी ठायी होती
स्वामीनिष्ठेने भारलेली
शिवबाची शिवशाही होती
आत्मभानाची पेटती मशाल
जिथे स्वराज्याची घाई होती.
शत्रूस चळाचळा कापविणारी
शिवबाची शिवशाही होती
मातीस फाटाफुटीचा शाप,
जरी आपसात दुही होती.
त्या सर्वाना मिटविणारी
शिवबाची शिवशाही होती.
हे पडती शब्द अपूरे
याहूनही बरेच काही होती!
स्वातंत्र्याची गाथा रचणारी
शिवबाची शिवशाही होती!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
Saturday, February 18, 2012
गोळाबेरीज
कुणी जिंकून दाखविले,
कुणी हरून दाखविले.
जे करायचे तेच
मतदारांनी करून दाखविले.
हरलेल्यांचा मुखभंग,
जिंकलेल्यांची द्वाही आहे!
उंदरा-मांजराचा खेळ म्हणजे
आपली लोकशाही आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी हरून दाखविले.
जे करायचे तेच
मतदारांनी करून दाखविले.
हरलेल्यांचा मुखभंग,
जिंकलेल्यांची द्वाही आहे!
उंदरा-मांजराचा खेळ म्हणजे
आपली लोकशाही आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, February 17, 2012
सबकुछ दिखता है
दावे-प्रतिदावे
सोबत एक्झिट पोल होतो,भल्याभल्यांचा अंदाज
मतदानयंत्रासमोर फोल होतो.
दवंडीच्या पहिलवानांचीही
मातीला पाठ लागते!
मतदान उघड झाले की,
कार्यकर्त्यांची वाट लागते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, February 16, 2012
द्या टाळी !
प्रचाराचे मुद्दे सोडून
उखाळय़ा-पाखाळय़ा काढल्या जातात.
राजकीय कलगीतुरा रंगताच
हशा आणि टाळय़ा पडल्या जातात.
ते तर भुलवायलाच येतात
आपण सावध असावे लागते!
आपण दात काढीत राहिलो की,
टाळय़ा वाजवीत बसावे लागते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, February 15, 2012
निवडणूक खर्च
कोटींनी खर्चून
शेकडय़ात दाखविला जातो.
निवडणूक आयोगही
जनतेबरोबर ठकविला जातो.
खर्चिलेले दाखविले जातात
वाटलेल्यांची तर गणतीही नाही!
अंधार फार झाला तरी
कुणाकडे साधी पणतीही नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, February 14, 2012
प्रेमसूत्र
प्रेमाच्या गावाकडे जाणारे
फाटेच फाटे असतात.
वर गुलाब फुलले तरी
खाली काटेच काटे असतात.
ना ट्वेंटी-ट्वेंटी, ना वन-डे,
प्रेम म्हणजे 'टेस्ट' असते!
तावून सुलाखून निघालेलेच
प्रेम ऑल दी बेस्ट असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
फाटेच फाटे असतात.
वर गुलाब फुलले तरी
खाली काटेच काटे असतात.
ना ट्वेंटी-ट्वेंटी, ना वन-डे,
प्रेम म्हणजे 'टेस्ट' असते!
तावून सुलाखून निघालेलेच
प्रेम ऑल दी बेस्ट असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, February 13, 2012
चकवाचकवी
कुणी करून दाखवलं
कुणी वरून दाखवलं.
सगळे बघत असतानाही
कुणी चरून दाखवलं.
केले काय? झाले काय?
सगळी दाखवादाखवी आहे!
ठकास महाठकांची
ही जाहीर चकवाचकवी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणी वरून दाखवलं.
सगळे बघत असतानाही
कुणी चरून दाखवलं.
केले काय? झाले काय?
सगळी दाखवादाखवी आहे!
ठकास महाठकांची
ही जाहीर चकवाचकवी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, February 12, 2012
लोक(प्रतिनिधी)शाही
दगडापेक्षा वीट मऊ म्हणीत
प्रतिनिधी निवडावे लागतात.
ठरावीक पर्यायातूनच
प्रतिनिधी आवडावे लागतात.
अजून तरी लोकांच्या पुढे
दुसरा पर्याय नाही आहे!
ही कसली लोकशाही?
ही तर लोकप्रतिनिधीशाही आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
प्रतिनिधी निवडावे लागतात.
ठरावीक पर्यायातूनच
प्रतिनिधी आवडावे लागतात.
अजून तरी लोकांच्या पुढे
दुसरा पर्याय नाही आहे!
ही कसली लोकशाही?
ही तर लोकप्रतिनिधीशाही आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
झेरॉक्स
पक्षीय जाहिरनामे म्हणजे
जनतेला जाहिर टोप्या असतात.
जुन्याच जाहिरनाम्यांच्या
झेरॉक्स कॉप्या असतात.
एकमेकांच्या जाहिरनाम्याची
जाहिर झेरॉक्स काढली जाते !
एकाने सोडली की,
सगळ्यांकडून सोडली जाते !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
जनतेला जाहिर टोप्या असतात.
जुन्याच जाहिरनाम्यांच्या
झेरॉक्स कॉप्या असतात.
एकमेकांच्या जाहिरनाम्याची
जाहिर झेरॉक्स काढली जाते !
एकाने सोडली की,
सगळ्यांकडून सोडली जाते !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, February 11, 2012
राजकीय खुजेपणा
दिल्लीतून गल्लीत येत
राजकारण करू लागले.
राष्ट्रीय नेतेसुद्धा
गल्लीबोळात फिरू लागले.
दिल्लीत राहून गल्लीची
त्यांना काळजी वाटू लागली!
राष्ट्रीय नेत्यांची उंची
हळूहळू घटू लागली!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
राजकारण करू लागले.
राष्ट्रीय नेतेसुद्धा
गल्लीबोळात फिरू लागले.
दिल्लीत राहून गल्लीची
त्यांना काळजी वाटू लागली!
राष्ट्रीय नेत्यांची उंची
हळूहळू घटू लागली!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, February 10, 2012
पक्षीय 'भाई'चारा
उमेदवारीची तिकिटं
अशा लोकांच्या हवाली आहेत.
जे उघड उघड
गुंड आणि मवाली आहेत.
तिकिटापुरत्या रामायणाचा
साक्षीदार भाई आहे!
वाल्याचे वाल्मिकी करण्याची
राजकीय पक्षांना घाई आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
अशा लोकांच्या हवाली आहेत.
जे उघड उघड
गुंड आणि मवाली आहेत.
तिकिटापुरत्या रामायणाचा
साक्षीदार भाई आहे!
वाल्याचे वाल्मिकी करण्याची
राजकीय पक्षांना घाई आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, February 9, 2012
सुगीचे दिवस
जसे सुगीनंतर पाखरं
फडफडताना दिसतात.
तसे निवडणुकीनंतर कार्यकर्ते
तडफडताना दिसतात.
सततच्या निवडणुकांसाठी
कार्यकर्त्यांचे नवस असतात!
निवडणुका म्हणजे
सुगीचेच दिवस असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
फडफडताना दिसतात.
तसे निवडणुकीनंतर कार्यकर्ते
तडफडताना दिसतात.
सततच्या निवडणुकांसाठी
कार्यकर्त्यांचे नवस असतात!
निवडणुका म्हणजे
सुगीचेच दिवस असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, February 8, 2012
निष्ठेची सच्चाई
निष्ठेचा आणखी एक पैलू
मतदानात उमजला जातो.
ज्याची बोगसगिरी जास्त
तोच सच्चा समजला जातो.
जेवढे जास्त लुच्चे,
तेवढे जास्त सच्चे आहेत !
सर्वत्र कार्यकर्ता नावाचे
नेत्यांकडे बगलबच्चे आहेत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मतदानात उमजला जातो.
ज्याची बोगसगिरी जास्त
तोच सच्चा समजला जातो.
जेवढे जास्त लुच्चे,
तेवढे जास्त सच्चे आहेत !
सर्वत्र कार्यकर्ता नावाचे
नेत्यांकडे बगलबच्चे आहेत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
निवडणुकीचा आँखो देखा हाल
बोगस मतदानासाठी
कार्यकर्त्यांच्या उडय़ा पडल्या.
उमेदवारांच्या बापासा
कार्यकर्त्यांनी मिशा काढल्या.
दुसर्याच्या बापासाठी कार्यकर्ते
एकमेकांना खुट्टय़ा मारीत होते!
हा आँखो देखा हाल बघून
मतदानयंत्र डबल शिट्टय़ा मारीत होते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कार्यकर्त्यांच्या उडय़ा पडल्या.
उमेदवारांच्या बापासा
कार्यकर्त्यांनी मिशा काढल्या.
दुसर्याच्या बापासाठी कार्यकर्ते
एकमेकांना खुट्टय़ा मारीत होते!
हा आँखो देखा हाल बघून
मतदानयंत्र डबल शिट्टय़ा मारीत होते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, February 7, 2012
’बंडल’बाजी
कालही खबर ताजी होती,
आजही खबर ताजी आहे.
मतदारांना भुलविण्यासाठी
बंडलबाजांची ’बंडल’बाजी आहे.
बंडलबाजांच्या बंडलबाजीवर
तुम्हांला वाटेल ही कोट्या आहेत !
पैसे घेणारांनो नीट बघा
घेतलेल्या नोटा खोट्या आहेत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
आजही खबर ताजी आहे.
मतदारांना भुलविण्यासाठी
बंडलबाजांची ’बंडल’बाजी आहे.
बंडलबाजांच्या बंडलबाजीवर
तुम्हांला वाटेल ही कोट्या आहेत !
पैसे घेणारांनो नीट बघा
घेतलेल्या नोटा खोट्या आहेत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
विरोधाभास
तेच तेच चेहरे,
तेच तेच दांडे आहेत
जुन्याच दांडय़ाला
बदललेले झेंडे आहेत.
झेंडय़ांची अदलाबदली
बदललेले चिन्ह आहे!
राजकीय विरोधाभासाने
लोकशाहीच सुन्न आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
तेच तेच दांडे आहेत
जुन्याच दांडय़ाला
बदललेले झेंडे आहेत.
झेंडय़ांची अदलाबदली
बदललेले चिन्ह आहे!
राजकीय विरोधाभासाने
लोकशाहीच सुन्न आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, February 6, 2012
लोकपाल समर्थकांनो..
लोकपाल समर्थकांनो..
टाकायचे म्हणून टाकू नका,
अन्यायापुढे झुकू नका.
लोकपालाच्या समर्थकांनो
तुमचे तरी मत विकू नका.
उतू नका, मातू नका
लोकपालाचा वसा टाकू नका.
'मै भी अण्णा, तू भी अण्णा'चा नारा
ठोकायचा म्हणून ठोकू नका.
खरेदीदार टपलेले आहेत
त्यांच्यात पैशांची धुंदी आहे!
लोकपालाच्या समर्थनाची
आणखी एक नामी संधी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
टाकायचे म्हणून टाकू नका,
अन्यायापुढे झुकू नका.
लोकपालाच्या समर्थकांनो
तुमचे तरी मत विकू नका.
उतू नका, मातू नका
लोकपालाचा वसा टाकू नका.
'मै भी अण्णा, तू भी अण्णा'चा नारा
ठोकायचा म्हणून ठोकू नका.
खरेदीदार टपलेले आहेत
त्यांच्यात पैशांची धुंदी आहे!
लोकपालाच्या समर्थनाची
आणखी एक नामी संधी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, February 5, 2012
स्वागत असो!
पुणे तिथे काय उणे?
सगळे पुणे बघत होते.
जिथे एका आरोपीचेही
प्रचंड असे स्वागत होते.
नेत्याचे स्वागत करण्यास
कार्यकर्ता तर कटिबद्ध आहे!
आरोपीवरचे आरोप सोडू
बाकी सगळे काही सिद्ध आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
सगळे पुणे बघत होते.
जिथे एका आरोपीचेही
प्रचंड असे स्वागत होते.
नेत्याचे स्वागत करण्यास
कार्यकर्ता तर कटिबद्ध आहे!
आरोपीवरचे आरोप सोडू
बाकी सगळे काही सिद्ध आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मुद्द्याचे बोला
मुद्द्याची गोष्ट तर
ऐकायलाही मिळत नाही.
निवडणूका कोणत्या आहेत?
हे सुद्धा कळत नाही.
त्यांची खात्री अशी की,
जनता तर पागल आहे !
म्हणूनच कळीच्या मुद्द्यांना
बेमालुमपणे बगल आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
ऐकायलाही मिळत नाही.
निवडणूका कोणत्या आहेत?
हे सुद्धा कळत नाही.
त्यांची खात्री अशी की,
जनता तर पागल आहे !
म्हणूनच कळीच्या मुद्द्यांना
बेमालुमपणे बगल आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, February 4, 2012
उमेदवारीची मोजणी
आपल्या गंजलेल्या मेंदूला
जरा पाणी पाजीत चला.
कुणाच्या घरात किती उमेदवार्या?
जरा निट मोजीत चला.
ते खानदानी नेते झालेत,
आपण खानदानी कार्यकर्ते आहोत !
आपल्याला विचारतो कोण?
जरी आपण कार्यकर्ते आहोत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
जरा पाणी पाजीत चला.
कुणाच्या घरात किती उमेदवार्या?
जरा निट मोजीत चला.
ते खानदानी नेते झालेत,
आपण खानदानी कार्यकर्ते आहोत !
आपल्याला विचारतो कोण?
जरी आपण कार्यकर्ते आहोत !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
साहित्यिकांना विनंती
केवळ हशा आणि टाळ्यांसाठी
लिहिणे बरे नाही.
केवळ साहित्यिक चाळ्यांसाठी
लिहिणे बरे नाही.
टाळ्यांसाठी लिहू नका
चाळ्यांसाठी लिहू नका.
पायाखालचे सोडून
आभाळाकडे पाहू नका.
साधे सोपे लिहा,
उगीच शब्दांचा गुंता नको!
तुमचे तुम्ही बघा
मराठी भाषेची चिंता नको!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
लिहिणे बरे नाही.
केवळ साहित्यिक चाळ्यांसाठी
लिहिणे बरे नाही.
टाळ्यांसाठी लिहू नका
चाळ्यांसाठी लिहू नका.
पायाखालचे सोडून
आभाळाकडे पाहू नका.
साधे सोपे लिहा,
उगीच शब्दांचा गुंता नको!
तुमचे तुम्ही बघा
मराठी भाषेची चिंता नको!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
Friday, February 3, 2012
डर्टी गेम
कुणाला चढवले जाते,
कुणाला लोळवले जाते.
इथल्या माणसा-माणसाला
पद्धतशीर खेळवले जाते.
माणसात माणूस राहिला नाही,
घरात घरात घर राहिले नाही !
एवढे गलिच्छ राजकारण
आम्ही आजवर पाहिले नाही !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणाला लोळवले जाते.
इथल्या माणसा-माणसाला
पद्धतशीर खेळवले जाते.
माणसात माणूस राहिला नाही,
घरात घरात घर राहिले नाही !
एवढे गलिच्छ राजकारण
आम्ही आजवर पाहिले नाही !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
(अप)प्रचार
अपप्रचार करता करता
प्रचार टाळला जात आहे.
प्रचाराच्या नावाखाली
शिमगा खेळला जात आहे.
ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये
निव्वळ गटारगंगा आहे!
प्रचार प्रचार राहिला नाही
हा तर राजकीय दंगा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
प्रचार टाळला जात आहे.
प्रचाराच्या नावाखाली
शिमगा खेळला जात आहे.
ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये
निव्वळ गटारगंगा आहे!
प्रचार प्रचार राहिला नाही
हा तर राजकीय दंगा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, February 2, 2012
आगीतून फुपाट्यात
नेत्यांच्या बंडखोरीचा
कार्यकर्त्यांना फटका आहे.
सामान्य कार्यकर्ता
ना घरका ना घाटका आहे.
ति्कडॆ उपेक्षेचा फुपाटा
इकडे पश्चातापाची आग आहे !
निष्ठेच्या प्रदर्शनासाठी
सगळे सोसणे भाग आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कार्यकर्त्यांना फटका आहे.
सामान्य कार्यकर्ता
ना घरका ना घाटका आहे.
ति्कडॆ उपेक्षेचा फुपाटा
इकडे पश्चातापाची आग आहे !
निष्ठेच्या प्रदर्शनासाठी
सगळे सोसणे भाग आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
उमेदवारीचा जुगार
कुणी बसला घोडय़ावर,
कुणाची माघार आहे.
पक्षीय उमेदवारी म्हणजे
राजकीय जुगार आहे.
ऐनवेळच्या माघारीमागे
बरेच काही शिजलेले असते!
बळीच्या बकर्याला
गोड बोलून पाणी पाजलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणाची माघार आहे.
पक्षीय उमेदवारी म्हणजे
राजकीय जुगार आहे.
ऐनवेळच्या माघारीमागे
बरेच काही शिजलेले असते!
बळीच्या बकर्याला
गोड बोलून पाणी पाजलेले असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, February 1, 2012
बंडाचा झेंडा
जेव्हा नवा पूजला जातो
जुना मात्र कुजला जातो.
तेव्हा पक्षीय निष्ठेचा
जाहीर गंडा वाजला जातो.
राजकीय गंडवागंडवीतच
पक्षीय निष्ठेचा गंडा असतो!
जुन्याजाणत्याच्या हातीच
बंडाचा झेंडा असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
जुना मात्र कुजला जातो.
तेव्हा पक्षीय निष्ठेचा
जाहीर गंडा वाजला जातो.
राजकीय गंडवागंडवीतच
पक्षीय निष्ठेचा गंडा असतो!
जुन्याजाणत्याच्या हातीच
बंडाचा झेंडा असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...