आजची वात्रटिका
--------------------
लपाछपीचा खेळ
समाजकारणाआडचे राजकारण,
लपविणे नेहमीच जड होत जाते.
समाजकारणाआडचे राजकारण,
कधी ना कधी उघड होत जाते.
तरीही लपाछपीचा हा खेळ,
अगदी उघडपणे खेळला जातो.
ज्यांचा असतो स्वार्थ दडलेला,
त्यांच्याकडून खुलासा टाळला जातो.
कर्त्या आणि करवित्याकडून,
सगळे राजकारण जाणले जाते !
आलाच डाव अंगाशी तर,
सरळ वेड्याचे सोंग आणले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9363
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9ऑगस्ट 2026














