Showing posts with label युद्धाची सिद्धता. Show all posts
Showing posts with label युद्धाची सिद्धता. Show all posts

Wednesday, March 11, 2026

युद्धाची सिद्धता....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
युद्धाची सिद्धता
गॅस म्हणाला सिलेंडरला,
आपली आता चांदी आहे.
युद्ध पेटलेले असताना,
आपल्याला खरी संधी आहे.
जनतेची खरी कसोटी,
जनता कुठवर लढू शकते?
पेट्रोल डिझेल तर टपलेले,
तेसुद्धा कधीही वाढू शकते.
ना युद्धबंदी, ना युद्धविराम,
जनतेचे महागाईशी युद्ध आहे !
गव्हाबरोबर किडेही रगडतात,
हे तर पुन्हा पुन्हा सिद्ध आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9213
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 मार्च 2026
----------------------------

 

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कठपुतळ्या ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, देव्या त्यांच्या अंगात आहेत. शिकल्या सवरलेल्यांचे नखरे, ...