Tuesday, April 11, 2023

डॉक्टर इन फेकॉलॉजी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
डॉक्टर इन फेकॉलॉजी
खोट्या नाट्या डिगऱ्यांच्या,
सारख्याच केसवर केस आहेत.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
मुन्नाभाई एमबीबीएस आहेत.
.
विश्वास ठेवा;विश्वास ठेवू नका,
तुमच्या हाती रिॲलिटी चेक आहे!
गल्लीतला काय?दिल्लीतला काय?
शेवटी जो फेक तो फेक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8227
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11एप्रिलमार्च2023
-------------------------------

सत्य बोध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सत्य बोध

तुम्ही सत्याचे शोधक व्हा,
तुम्ही सत्याचे बोधक व्हा,
सत्य ही एक साधना आहे,
तुम्ही सत्याचे साधक व्हा.

असे नाही, सत्य पचत नाही,
असेही नाही, सत्य रुचत नाही.
सत्यामुळे ते गोंधळून जातात,
मग स्वार्थापुढे काही सुचत नाही.

सत्य काही काळ टोचले जाते,
सत्य काही काळ जाचले जाते!
एकदा स्वार्थ संपला की,
कोणतेही सत्य पचले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6774
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11एप्रिल2023
 

Monday, April 10, 2023

नॉट रिचेबल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नॉट रिचेबल

दुसऱ्याचा मोबाईल कॉल जेंव्हा
तुम्हाला नॉट पोचेबल होतो.
तेंव्हा तुम्ही आणि तुमचा फोन,
लोकांसाठी नॉट रिचेबल होतो.

तुम्ही कव्हरेज एरिया ओलांडला,
असा नॉट रिचेबलचा अर्थ असतो.
आपली रेंज कळू न देण्याचा,
तुमचा प्रयत्नही मग व्यर्थ असतो.

राजकारणातले आणि प्रेमातले,
नॉट रिचेबल धक्कादायक असते!
मग त्याचीचर्चा तर होणारच,
नॉट रिचेबलच चर्चालयक असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8226
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10एप्रिलमार्च2023
 

राजकारणाचा प्राधान्यक्रम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

राजकारणाचा प्राधान्यक्रम

जसे राजकारण भाषेचे केले जाते,
तसे राजकारण प्रांतांचे केले जाते.
जसे राजकारण पंथाचे केले जाते,
तसे राजकारण संतांचे केले जाते.

जसे राजकारण शक्तीचे केले जाते,
तसे राजकारण युक्तीचे केले जाते.
जसे राजकारण श्रद्धेचे केले जाते,
तसे राजकारण भक्तीचे केले जाते.

जसे राजकारण धर्माचे केले जाते,
तसे पुराणाबरोबर पोथीचे केले जाते!
सगळेच राजकारण करून झाले की,
शेवटी राजकारण जातीचे केले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6773
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10एप्रिल2023
 

Sunday, April 9, 2023

बीभत्स लावणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बीभत्स लावणी

नऊ वारीतली लावणी,
लोकांसमोर उघडी झाली.
महाराष्ट्राची लोककला,
नको तेवढी बेगडी झाली.

मान मिळावा,धन मिळावे,
लावणीसुद्धा लावणी वाटावी.
रुमाल फेटे उडवताना,
ओठातून जोरात शिट्टी फुटावी.

डीजेच्या तालावरती,
आता लावणीचा कचरा आहे!
ओंगळवाण्या बीभत्सतेचा,
बीभत्सपणे निचरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8225
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9एप्रिलमार्च2023
 

जयंत्यांची विचारसंहिता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

जयंत्यांची विचारसंहिता

बहुतेक साऱ्या जयंत्या,
नाचून साजऱ्या केल्या जातात.
खूपच कमी जयंत्या मात्र,
वाचून साजऱ्या केल्या जातात.

जयंत्या टिच्चून साजऱ्या करा,
विचार वेचून साजऱ्या करा.
जयंत्या नाचून करण्यापेक्षा,
जयंत्या वाचून साजऱ्या करा.

विचारांच्या तालावरतीच,
सारा समाज नाचला पाहिजे!
फक्त डीजेचा आवाज नको,
थोरांचा विचार पोचला पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6772
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
9एप्रिल2023
 

Saturday, April 8, 2023

तोंड देखले....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

तोंड देखले

खोट्यानाट्या व्यवहाराला,
सारेच इथे सोकले आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
सारेच इथे तोंडदेखले आहेत.

सारेचच कसे वरवरचे?
सारेच कसे वरपांगी आहे ?
स्वतःच घेतले सोंग ज्याने,
दुसऱ्या म्हणेणा,ढोंगी आहे.

सच्चाईच्या कडवटपणाची,
कडवट चव चाखली आहे!
सोंग ढोंगाची दुनिया सारी,
सारेच काही नकली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8224
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8एप्रिलमार्च2023
 

कडकडाट ते 'गड' गडाट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
कडकडाट ते 'गड' गडाट
राजकीय फडा - फडावरती,
हश्या टाळ्यांचा कडकडाट असतो.
शक्ती आणि भक्ती गडा-गडावरती,
मृदंग- टाळांचा गडगडाट असतो.
कडकडाटाला आणि ' गड 'गडाटाला,
गर्दी आणि गर्दीचीच ओढ आहे.
राजकारण आणि धर्मकारण म्हणजे,
अगदी परस्परपूरक अशी जोड आहे.
जिथे जिथे धर्मकारण संपले जाते,
तिथे तिथे राजकारण सुरू केले जाते !
राजकारणाकडून धर्मकारणाला,
गरजेपोटी आपला गुरु केले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6771
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
8एप्रिल2023

 

Friday, April 7, 2023

महाराष्ट्राची हास्य जत्रा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
महाराष्ट्राची हास्य जत्रा
लोकशाही स्वातंत्र्याची स्वैरता,
लोकशाहीलाच खतरा झाली आहे.
अगदी थोडक्यात सांगायचे तर,
महाराष्ट्राची हास्य जत्रा झाली आहे.
एकमेकांच्या हातामध्ये,
एकमेकांचे राजकीय बिंग आहे.
शेरास सव्वाशेर वाटावा असा,
प्रत्येकजण कॉमेडी किंग आहे.
पहिली एपिसोड संपेपर्यंत तर,
दुसरा तिसरा एपिसोड रेडी आहे!
वरवर कॉमेडी वाटली तरी,
ही खरी महाराष्ट्राची ट्रॅजेडी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8223
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7एप्रिलमार्च2023

 

विचारवंत ते प्रचारवंत...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

विचारवंत ते प्रचारवंत

राजकीय तमाशाचा रंगला फड,
ढोलक्या तुणतुण्या लावणीला आहेत.
कालच्याच धडाडत्या तोफा,
आज मावश्या बनूण दावणीला आहेत.

काल गाजवले मुलुख मैदान,
आज फुसक्या आणि ठुसक्या आहेत.
कालचे विचारवंत झाले प्रचारवंत,
आज त्यांच्या तोंडाला मुसक्या आहेत.

काल जे सरळमार्गी होते,
आज भूमिका उलट्या सुलट्या आहेत!
मारल्या एवढ्या कलट्या की,
नको तश्या आलट्या पलट्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-6770
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
7एप्रिल2023
 

Thursday, April 6, 2023

पाऊस:एक नैसर्गिक आपत्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
पाऊस:एक नैसर्गिक आपत्ती
निसर्गापुढे माणूस म्हणजे,
किस झाड की पत्ती आहे?
म्हणूनच तर 10×5 पाऊसही,
आता नैसर्गिक आपत्ती आहे.
निसर्ग फक्त लहरीच नाही,
निसर्गच बाजार बसवा आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती,
हा शब्दसुद्धा तसा फसवा आहे.
बळीराजासाठी व्याख्यांचा आढावा,
असाच पुन्हा पुन्हा घ्यावा लागेल!
जर अस्मानाने अन्याय केला,
तर सुलतानालान्याय द्यावा लागेल!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8222
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6एप्रिलमार्च2023


फडतूस ते काडतूस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
फडतूस ते काडतूस
कुणी म्हणतोय,फडतूस आहे,
कुणी म्हणतोय,काडतूस आहे.
एकूणच काय तर...?
सगळाच शाब्दिक धुडगूस आहे.
शाब्दिक राजकीय धुडगूसावरून,
एक प्रकार नक्की लक्षात आला.
डायलॉगवर डायलॉग मारतील,
पण कुणीच झुकेगा नही साला.
ते झुकले नाहीत;झुकणार नाहीत,
सगळेच्या सगळे कळून चुकते आहे !
लोकशाहीची मान मर्यादा सोडल्याने,
महाराष्ट्राची मान शरमेने झुकते आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6769
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
6एप्रिल2023

Wednesday, April 5, 2023

तवा बाबा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

तवा बाबा

सगळेच बाबा प्रचंड गाजतात,
सध्या एका बाबाची हवा आहे.
चमत्कारिक बाबाच्या बुडाखाली,
अगदी गरमागरम तवा आहे.

ओव्याऐवजी तोंडी शिव्या आहेत,
ज्या आशीर्वाद म्हणून देता येतात.
तवा तापलेला असल्यावरच,
पोळ्या मस्त भाजून घेता येतात.

बुडाला तवा पोळत कसा नाही?
भक्तांना तर आश्चर्याचा धक्का आहे !
साधुसंत असल्याचा दावा नाही,
पण बाबा बुडाला मात्र पक्का आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6768
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
5एप्रिल2023
 

डिग्री....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

डिग्री

वादावरती वाद रंगतात,
आता वादाच्या भोवऱ्यात डिग्री आहे.
वादावादीसाठी काहीही चालते,
यावरती तर प्रत्येक जण ॲग्री आहे.

नाहीतरी बोगस डिग्री धारकांची,
आपल्या देशामध्ये कुठे कमी आहे?
निवडणूक जिंकण्यासाठी
कसलीच डिग्री लागत नाही,
याची मात्र अगदी पक्की हमी आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8221
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5एप्रिलमार्च2023
 

Tuesday, April 4, 2023

अशी ही झुकवाझुकवी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अशी ही झुकवाझुकवी

जेंव्हा निकाल सोयीने लागला जातो,
तेव्हा त्यांच्यासाठी कायदा पूज्य आहे.
मग कायद्याला वाकविणारेच म्हणतात,
इथे तर फक्त कायद्याचेच राज्य आहे.

पाहिजे तसे आणि पाहिजे तेव्हा,
फक्त तेच कायद्याला वाकवू शकतात!
कायद्याबरोबर आपल्यालाही,
तेच बेमालूमपणे झुकवू शकतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8220
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
4एप्रिलमार्च2023
 

ज्याचे त्याचे आयपीएल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ज्याचे त्याचे आयपीएल

कुणासाठी आयपीएलचा अर्थ,
फक्त इंडियन प्रीमियर लीग आहे.
कुणासाठी आयपीएल म्हणजे,
इंडियन पॉलिटिकल लीग आहे.

कुणासाठी आयपीएल म्हणजे,
मौज,मस्ती आणि क्रिकेट आहे.
कुणासाठी आयपीएल म्हणजे,
भारतीय क्रिकेट संघाचे गेट आहे.

त्याच्यासाठी मात्र वेगळाच अर्थ,
जो प्रेमवेडा आणि नटखट आहे!
त्याच्यासाठी आयपीएल म्हणजे,
इश्क,प्रेम,लव्हचाच शॉर्टकट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6767
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
4एप्रिल2023
 

Monday, April 3, 2023

वज्रमूठ ते वज्रझूठ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वज्रमूठ ते वज्रझूठ

कुणी म्हणाले; वज्रमूठ आहे,
कुणी म्हणाले;वज्रझूठ आहे.
एकूणच सगळा प्रकार म्हणजे,
निव्वळ शाब्दिक काथ्याकूट आहे.

वज्रझूठवाल्या मंडळींनी,
उगीच काथ्या कुटता कामा नये.
वज्रमूठवाल्या मंडळींनीही,
आता चुकूनही फुटता कामा नये.

झाकली मूठ झाकलीच राहू द्या,
ती किती डोक्या-खोक्याची आहे?
वज्रमूठ ढीली झाली तर...
ती सूचनाच खतरा धोक्याची आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6766
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
3एप्रिल2023
 

पक्षीय खोड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पक्षीय खोड

पक्षा-पक्षाचा निम्मा वेळ,
पक्ष फोडाफोडीत जातो आहे.
पक्षा- पक्षाचा निम्मा वेळ,
मुद्दे खोडा-खोडीत जातो आहे.

फोडाफोडी आणि खोडाफोडी,
ही तर पक्षा- पक्षाची खोड आहे.
इतरांचाच विचार करण्यात,
पक्षा -पक्षावर राजकीय लोड आहे.

इतरांचे मुद्दे खोडता खोडता,
आपले मुद्देच राहून जातात !
भावनेच्या भरात मग,
सगळेच पक्ष वाहून जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8219
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3एप्रिलमार्च2023
 

Sunday, April 2, 2023

सरकार नपुंसक आहे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सरकार नपुंसक आहे

सुप्रीम कोर्टाच्या शेरेबाजीचा,
सरकारला अर्थ लावता आला नाही.
विरोधकांनाही आपला आनंद,
फार काही लपवून ठेवता आला नाही.

सुप्रीम कोर्टाच्या शेरेबाजीचा,
कुणी वेगवेगळा अर्थ घेऊ शकते!
जर हिजड्यांनी अवमान याचिका
दाखल केली तर,
प्रत्यक्ष कोर्टाची पंचायत होऊ शकते!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8218
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2एप्रिलमार्च2023
 

लाचखोरीचे लागेबांधे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लाचखोरीचे लागेबांधे

आज जिकडे बघावे तिकडे,
फक्त लाच एके लाच आहे.
सरकारी कार्यालयातून तर,
भ्रष्टाचाऱ्यांचा नंगानाच आहे.

तथाकथित समाजसेवकच,
भ्रष्टाचाऱ्यांचे दलाल झाले.
त्यामुळेच गोरगरीब जनतेचे,
पहिल्यापेक्षा जास्त हाल झाले.

जसे घेणारे मस्तवाल आहेत तसे,
काही देणारीही मस्तवाल आहेत.
लाचखोरीच्या चढाओढीमुळे,
लाचखोर मात्र मालामाल आहेत.

घेणाराला तर नाहीच नाही,
पण देणारालाही कुठे लाज आहे?
तेवढी व्यवस्था बरबटलेली,
जेवढा बरबटलेला समाज आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6765
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
2एप्रिल2023
 

Saturday, April 1, 2023

फाटाफूट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

फाटाफूट

ज्यांनी दुसऱ्यासाठी खड्डा खोदला,
तिथे नक्की त्यांचीच कबर आहे.
त्यामुळे जिकडून तिकडून,
आता फाटाफूटीचीच खबर आहे.

फाटाफूट म्हणजे तरी काय?
सरळ सरळ घरवापसी आहे !
दुसऱ्यांनी मध्ये बोलूच नये,
त्यांचा मामलाच आपसी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8217
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
1एप्रिलमार्च2023
 

इम्पॅक्ट प्लेयर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

इम्पॅक्ट प्लेयर

तो सहजासहजी भेटत नाही,
तसा तो खूपच रेअर असतो.
पण प्रत्येकाच्या आयुष्यात,
एक इम्पॅक्ट प्लेयर असतो.

ताण-तणाव आणि घासा-घिसीने,
सगळे आयुष्य सालटून जाते.
एकदा इम्पॅक्ट प्लेयर भेटला की,
सगळे आयुष्य पालटून जाते.

इम्पॅक्ट प्लेयर असतो परीस,
त्याला नीट जाणून घ्यायला हवे!
आयुष्याचे सोने होण्यासाठी,
आपण मात्र लोखंड व्हायला हवे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6764
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
1एप्रिल2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...