Saturday, June 17, 2023

राजकीय बेरकीपणा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय बेरकीपणा

फक्त राजकारणी लोकच,
राजकारण खेळतात असे नाही.
फक्त राजकारणी लोकच,
कुठेही गोंडा घोळतात असे नाही.

आपल्या अवती भोवतीची,
गैरराजकारणी मंडळी हेच करतात.
आपला गैरसमज वाढत जातो,
राजकारणीच हे डावपेच करतात.

जसे मस्तवाल जनावरांपेक्षा,
गरीब जनावरेही मारकी असतात !
तसे आपल्या सभोवताला/ची माणसे,
राजकारण्यांपेक्षाही बेरकी असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8279
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17जून2023

गुपित एका जाहिरातीचे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गुपित एका जाहिरातीचे

तो हितचिंतक जाहिरातदार कोण?
हे कोडे काही अजूनही सुटलेले नाही.
सगळे मूग गिळून गप्प आहेत,
अजून कशालाच तोंड फुटलेले नाही.

कुणी अज्ञाताने जाहिरात द्यायला,
ते काही दानपेटीतले गुप्त दान नाही.
बिल कुणाच्या नावावर फाटणार?
कसे मानावे याचेही काही ज्ञान नाही?

ज्यांना जाहिरातींचे पैसे मिळणार,
त्यांच्याकडे आपले लक्ष जाते काय ?
इतरांच्या बेडरूमामध्येही घुसणारे,
खास सूत्रं यावेळी झोपले होते काय?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6837
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17जून2023
 

Friday, June 16, 2023

दैनिक वात्रटिका16जून2023वर्ष तिसरेअंक -12वा

दैनिक वात्रटिका
16जून2023
वर्ष तिसरे
अंक -12वा
अंक डाऊनलोड लिंक-

गहिराती आयडॉल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गहिराती आयडॉल

क्रिकेट आणि सिनेमातले हिरो,
गुटखा खायला सांगू लागले.
नव्या पिढीचे तकलादू आयडॉल,
नको त्या जाहिरातीत रंगू लागले.

सगळ्या धंदेवाईक आयडॉलच्या,
अगदी धंदेवाईक जाहिराती आहेत.
त्यांना आयडॉल मानणारांना सांगा,
तुमचे आयडॉलच गहिराती आहेत.

गहिराती आयडॉलच्या तालावरती,
आपल्या नव्या पिढ्या नाचत आहेत !
लोक त्यांचे अंधानुकरण करतात,
म्हणूनच त्यांनाही धंदे सुचत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6836
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16जून2023
 

Thursday, June 15, 2023

दैनिक वात्रटिका 15जून2023 वर्ष तिसरे अंक -11वा....

दैनिक वात्रटिका
15जून2023
वर्ष तिसरे
अंक -11वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1nR8H7JzCCPywm8Yjhs5EcV2VcuTN9yEX/view?usp=drivesdk
 

अवस्था ते व्यवस्था...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

अवस्था ते व्यवस्था

आज भ्रष्ट लोकांच्या हातूनच
सज्जननांचे सत्कार होत आहेत.
मग भ्रष्ट लोकांच्या तोंडून,
सज्जनतेचे फुत्कार होत आहेत

आजच्या वाढत्या भ्रष्टतेची,
हीच तर खरी गमाडी गंमत आहे.
भ्रष्टांच्या हातून सत्कार नाकारण्याची,
सज्जनांमध्ये कुठे हिम्मत आहे?

तोंड दाबून बुक्क्यांचा मार,
अशी आज सज्जनांची अवस्था आहे!
इच्छा असून नाकारता येत नाही,
तिचेच नाव आजची व्यवस्था आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8278
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15जून2023

मानदुखी ते कानदुखी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मानदुखी ते कानदुखी

कानामागून आले तिखट झाले,
म्हणूनच तर ही कानदुखी आहे.
वरवर कानदुखी असली तरी,
वास्तवात मात्र ही मानदुखी आहे.

प्रत्येकाची आपली प्रतिष्ठा आहे,
प्रत्येकाचाच आपापला मान आहे.
या मान दुखीचे खरे कारण,
एका जाहिरातीचे अख्खे पान आहे.

मानदुखीची ना कानदुखीची,
अज्ञात हितचिंतकाला चिंता आहे !
त्याच्याच 'ॲड' व्हान्सपणामुळे,
लोकप्रियतेचा नवीनच गुंता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6835
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15जून2023
 

Wednesday, June 14, 2023

दैनिक वात्रटिका14जून2023वर्ष तिसरेअंक -10वा

दैनिक वात्रटिका
14जून2023
वर्ष तिसरे
अंक -10वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1muQ169czImKtYnHXi3WarijLuBFtcfBO/view?usp=drivesdk

एका जाहिरातीचे परिणाम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

एका जाहिरातीचे परिणाम

एका जाहिरातीने जाहीर झाले,
काय बाहेर?काय आत आहे?
विरोधकांनी गौरवोद्गार काढले,
व्वा....व्वा.....काय बात आहे?

देशात नरेंद्र.... राज्यात देवेंद्र,
कालबाह्य हा नारा आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या पसंतीचा,
सर्वेक्षणाचा खेळ न्यारा आहे.

जाहिरात काही सरकारी नाही,
ही जाहिरात तर खाजगी आहे !
आतमध्ये नाराजगी असली तरी,
मुखकमलावरती ताजगी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8277
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14जून2023
 

भावी मुख्यमंत्र्यांच्या देशा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भावी मुख्यमंत्र्यांच्या देशा...

जी गोष्ट पूर्वीही घडत होती,
तीच मोठ्या वेगाने घडू लागली.
भावी मुख्यमंत्र्यांची लोकसंख्या,
महाराष्ट्रात वेगाने वाढू लागली.

कालही घडले; आजही घडतेय,
कदाचित उद्याही हेच घडू शकते.
जेवढी पक्षीय फटाफूट जास्त होईल,
तेवढी ही लोकसंख्या वाढू शकते.

घोडा मैदान सामने आहे,
आपल्याला फक्त पहावे लागेल !
हे भावी मुख्यमंत्र्यांच्या देशा.....
असे महाराष्ट्र गीत लिहावे लागेल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-6834
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14जून2023
 

Tuesday, June 13, 2023

दैनिक वात्रटिका 13जून2023 वर्ष तिसरे अंक -9वा

दैनिक वात्रटिका
13जून2023
वर्ष तिसरे
अंक -9वा
अंक डाऊनलोड लिंक-
https://drive.google.com/file/d/1l3QzN-_3hJ9zHWF_A2dXqwFPkZB2JUH5/view?usp=drivesdk
 

राजकारणाची अपरिहार्यता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकारणाची अपरिहार्यता

सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची,
प्रत्येकाची एक वेगळी नजर असते.
विषय कुठलाही असला तरी,
तिथे राजकारण नक्की हजर असते.

कालच्या आपल्या भूमिकेवरून,
आज त्यांनाच परत फिरावे लागते !
राजकारण म्हणजे त्यांचा श्वास,
जगण्यासाठी तर ते करावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8276
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13जून2023
 

यशापयश...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

यशापयश

अपयश नेहमीच अनाथ असते,
यशाला मात्र अनेक बाप असतात.
अपयश आरोपीच्या पिंजऱ्यात,
यशाला अनेक गुन्हे माफ असतात.

अपयशाला नसतो पाठीराखा,
यशाची मात्र पाठराखण असते.
अपयशाचा होतो तिरस्कार,
यशाकडे कौतुकाचे टोकन असते.

यशाचा सर्वांनाच हेवा असतो,
यशाच्या श्रेयावरती दावा असतो!
यश सर्वांनाच हुरळून टाकते,
अपयश हा वैयक्तिक ठेवा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6833
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13जून2023
 

Monday, June 12, 2023

दैनिक वात्रटिका 12जून2023 वर्ष तिसरे अंक - 8वा

दैनिक वात्रटिका
12जून2023
वर्ष तिसरे
अंक - 8वा
अंक डाऊनलोड लिंक-
 https://drive.google.com/file/d/1l3QzN-_3hJ9zHWF_A2dXqwFPkZB2JUH5/view?usp=drivesdk

पैचान कोण?....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
पैचान कोण?

शिवसेनेसोबत भारतीय जनताही,
अजून एकाच प्रश्नावर अडली आहे.
अजूनही नाव कोड्यातच आहे,
सेना नेमकी कुणी फोडली आहे?

सिद्ध करा डोके आहे;खोके नाही,
जर उत्तर लक्षात आलेले असेल ?
नाही तर उद्या आणखी कुणाचे,
नवे नाव जाहीर झालेले असेल !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक  वात्रटिका
12जून2023

टिवटिवाटाचा कळस...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
टिवटिवाटाचा कळस
वाघ म्हटले तरी खातो आहे,
वाघोबा म्हटले तरी खातो आहे.
ट्विटरवरचा वितंडवाद तर,
वेगळ्याच वळणाने जातो आहे.
इंद्रियांवर जित मिळवणारालाही,
संघर्ष अव्हॉईड करता आला नाही.
कितीही ताई - माई केले तरी,
त्याचा परिणाम काही झाला नाही.
चारित्र्याचे जाहीर धिंडवडे उडवित,
कुणीच विचित्र सारखे वागू नका !
परस्परांच्या सहनशीलतेचा अंत,
कृपा करून कुणीसुद्धा बघू नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6832
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12जून2023

 

Sunday, June 11, 2023

दैनिक वात्रटिका11जून2023वर्ष तिसरे

दैनिक वात्रटिका
11जून2023
वर्ष तिसरे
अंक - सातवा
अंक डाऊनलोड लिंक-

राजकारणाची पातळी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-------------------------

राजकारणाची पातळी

राजकारणाच्या पातळीवर,
तेंव्हा तेंव्हा बोलले जात असते.
जेंव्हा जेंव्हा नेत्यांकडून,
पातळीला सोलले जात असते.

घसरत्या राजकीय पातळीची,
नक्की सीमा ठरलेली नाही.
आजकाल तर असे वाटते,
काही पातळीच उरलेली नाही.

घसरलेली पातळीच,
आज पातळीची मोजपट्टी आहे !
एकाचे बघून दुसऱ्याच्या,
राजकीय नैतिकतेला सुट्टी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8275
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11जून2023

अल निनो इफेक्ट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
अल निनो इफेक्ट
हे अल निनो इफेक्ट प्रकरण,
पंचांगवाल्यांना कळाले तर बरे होईल.
त्यांच्याबरोबर भाकितावाल्यांचेही,
पावसाचे भविष्य नक्की खरे होइल.
वेधशाळेचासुद्धा अंदाज चुकातोच,
ते अपडेट होऊन चुका मान्य करतात.
कधी कधी मात्र वेधशाळेवाले,
आपल्यावरचा विश्वास शून्य करतात.
सगळ्यांचेच अंदाज चुकावेत,
असे काही तरी चमत्कारिक घडू द्या !
अल निनोत अंग चोरणारा मान्सून,
अगदी मोकळ्या मनाने पडू द्या !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6831
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
11जून2023

 

Saturday, June 10, 2023

दैनिक वात्रटिकाl10जून2023lवर्ष तिसरे lअंक - सहावा

दैनिक वात्रटिका
10जून203
वर्ष तिसरे
अंक - सहावा
अंक डाऊनलोड लिंक-

साला एक स्टेटस......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
साला एक स्टेटस...
साला एक व्हाट्स ॲप स्टेटस,
शांतता धोक्यात आणू लागले.
ज्याला जशी जमेल ते,
सामाजिक शांततेला ताणू लागले.
साला एक व्हाट्स ॲप स्टेटस,
दंगलींची आग भडकवू लागले.
तरीही जे ते आपलेच झेंडे,
रस्त्यावरती फडकवू लागले.
साला एक व्हाट्स ॲप स्टेटस,
त्याला कसे म्हणावे पोरखेळ आहे?
सोशल मीडियाच्या विध्वंसकतेचा,
हा समाजविघातक खेळ आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6830
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
10जून2023

 

धमकी सत्राचे सार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

धमकी सत्राचे सार

कुणी कुणी खमक्या आहेत,
कुणी फक्त चमक्या आहेत.
तरीही आजकाल सर्वांनाच,
धमक्यांमागे धमक्या आहेत.

याचा अर्थ मात्र असा नाही,
धमकीबहाद्दर डेरिंगबाज आहेत.
कुणाच्यातरी जीवावरच,
धमकीबहाद्दरांचे हे माज आहेत.

एकदा नाही;दोनदा नाही,
हा प्रकार तर वारंवार आहे !
" मुँह छुपाके जिओ...."
हे धमकी सत्रांचे सार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8274
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10जून2023
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...