Saturday, May 10, 2025

दैनिक वात्रटिका l 10मे2025वर्ष- चौथेअंक - 340 वा l पाने -57



आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 10मे2025
वर्ष- चौथे
अंक - 340 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1wlZsFhrOjxNbMfC0C-qo5MLoCi46sg0k/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 53
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) भूमिका
4) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

#युद्धविराम
#india #pakistan #Ceasefire #SJaishankar #IndianArmy

 

नागरी युद्ध संहिता ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------


नागरी युद्ध संहिता

युद्धाच्या नको तशा फोटोंसोबत,
नको तसे व्हिडिओ रेटू लागले.
हौश्या नवशा आणि गौश्यांना,
युद्ध म्हणजे व्हिडिओ गेम वाटू लागले.

युद्ध म्हणजे उत्सव नसला तरी
कोण काय करील याचा नेम नाही.
त्या सोशल मीडियापटूंना सांगा,
युद्ध म्हणजे काही व्हिडिओ गेम नाही.

हल्ले चढवा;मनोधैर्य वाढवा,
मात्र उगाच असूरी हर्ष नको !
फेकाफेकी आणि टोकाटोकी सोबत,
नैराश्य आणि उन्मादाचा स्पर्श नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8912
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 मे 2025
 

Friday, May 9, 2025

दैनिक वात्रटिका l 9मे2025वर्ष- चौथेअंक - 339 वा l पाने -57


आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 9मे2025
वर्ष- चौथे
अंक - 339 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1w6nMA7YzhUaTpWT5OKZN2sEOyDzU_eQe/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 53
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

 

एकत्रीकरणाचे इशारे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

एकत्रीकरणाचे इशारे

जिकडून बघावे तिकडून,
मिलनाचे संकेत येऊ लागले.
अगदी उघड उघडपणे,
एकत्रीकरणाचे इशारे देऊ लागले.

इशाऱ्या इशाऱ्यामध्ये,
राजकीय भूकंपाचे धक्के आहेत.
राजकारणी ते राजकारणी,
सब घोडे बारा टक्के आहेत.

एकत्रीकरणाचा अभिमान वाटतो,
त्यामुळे कोणी वरमत नाही !
एक मात्र नक्की आहे,
सत्तेशिवाय कुणालाच करमत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8911
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 मे 2025
 

Thursday, May 8, 2025

दैनिक वात्रटिका l 8मे2025वर्ष- चौथेअंक - 338वा l पाने -57


आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 8मे2025
वर्ष- चौथे
अंक - 338वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1vMWTLpCURjc64fkV220NOBeUMuMe2ztJ/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 52
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

 

ऑपरेशन सिंदूर चे अर्थ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

ऑपरेशन सिंदूर चे अर्थ

एकीकडे पाकिस्तानच्या डोळ्यात,
झणझणीत असे अंजन आहे.
दुसरीकडे टीव्ही चॅनलच्या कृपेने,
युद्ध म्हणजे एक मनोरंजन आहे.

विरोधकांकडून सैनिकांचे,
इतरांकडून सरकारचे अभिनंदन आहे.
भारताच्या धैर्याला आणि शौर्याला,
संपूर्ण जगाकडून वंदन आहे.

चोर ते चोर वर पुन्हा शिरजोर,
पाकड्यांचे माकड चाळे व्यर्थ आहेत !
भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे,
ज्याचे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8910
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 मे 2025
 

Wednesday, May 7, 2025

दैनिक वात्रटिका l 7मे2025वर्ष- चौथेअंक - 337वा l पाने -57

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 7मे2025
वर्ष- चौथे
अंक - 337वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1uhdjqTO92P8MQqX-r9xPnyA003uCHvA0/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 51
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे


 

युद्धाचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
युद्धाचे वास्तव
कुठे युद्धाचा ठराव आहे,
कुठे युद्धाचा सराव आहे.
फुगलेल्या बेडकाचे,
उगीच डराव डराव आहे.
युद्ध नको;युद्ध हवे,
सर्वांनीच जोर धरला आहे.
न्यूज चॅनलवाल्यांनी तर,
देशात युद्धज्वर पेरला आहे.
कुणाचे स्टेटस,कुणाची स्टोरी,
कुणाची पोस्टआणि रील आहे !
दुरून डोंगर साजरे,
असेच युद्धाचे थ्रील आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8909
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 मे 2025

 

Tuesday, May 6, 2025

दैनिक वात्रटिका l 5आणि 6मे2025वर्ष- चौथेअंक - 335 आणि 336वा l पाने -63


आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 5आणि 6मे2025
वर्ष- चौथे
अंक - 335 आणि 336वा l पाने -63
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1tdCm8xIMDIOkT-wSPlUjf9Jqq26aTHc-/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 50
2) सूर्यकांत डोळसे यांच्या 50+ सदाबहार
वात्रटिका
3) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे


 

पक्षप्रवेशाचे सोहळे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

पक्षप्रवेशाचे सोहळे

यांचे त्यांच्याकडून ओढले जातात,
त्यांचे यांच्याकडून ओढले जातात.
सगळ्यांच्या पक्षप्रवेशाचे सोहळे,
अगदी असेच पार पडले जातात.

मित्र पक्षांच्या पक्षप्रवेशाची,
काही आगळीवेगळी मौज असते.
काल आपल्या विरुद्ध लढलेली,
मित्र पक्षातली नवी फौज असते.

सहन होत नाही;सांगताही येत नाही,
अशीच तर सगळ्यांची तऱ्हा आहे !
पक्षप्रवेशाचे पंचनामे त्यांचे ते करतील,
आपण तो न केलेलाच बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8908
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 मे 2025
 

Monday, May 5, 2025

रुसवे फुगवे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

रुसवे फुगवे

जनतेला प्रश्न पडू लागला,
कोण कुणापेक्षा नागवे आहेत?
मित्रपक्ष कोणतेही असोत,
त्यांच्यामध्ये रुसवे फुगवे आहेत.

कुणी कुणी रुसत आहेत,
कुठेतरी जाऊन बसत आहेत.
परस्परांच्या रुसवा फुगविला,
तेच गालात हसत हसत आहेत.

उठता बसता रुसवा फुगवी आहे,
उठता बसता मनधरणी आहे !
विरोधकांचा नेहमीचा आरोप,
जैसी करणी वैसी भरणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8907
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 मे 2025
 

Sunday, May 4, 2025

दैनिक वात्रटिका l 4मे2025वर्ष- चौथेअंक - 334वा l पाने -57


आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 4मे2025
वर्ष- चौथे
अंक - 334वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 49
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार 
वात्रटिका 
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
 

पक्षीय गोपाळकाला

आजची वात्रटिका
-------------------
पक्षीय गोपाळकाला
काही तिकडे गेल्यासारखे वाटतात,
काही इकडे आल्यासारखे वाटतात.
आजकाल सर्वच राजकीय पक्ष,
गोपाळकाला झाल्यासारखे वाटतात.
परस्परांचा गोपाळकाला बघून,
त्याचे कुणालाच काही वाटत नाही
पक्षांतर चुकीचे आहे हे बोलायला,
त्यामुळे कोणाचीही जीभ भेटत नाही.
आजचे पक्षीय सहकारी,
कालचेसुद्धा पक्षीय सहकारी आहेत !
सगळेच गोपाळकाल्याचे लाभार्थी,
एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8906
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 मे 2025
 

Saturday, May 3, 2025

आजचा अंकदैनिक वात्रटिका l 2मे2025वर्ष- चौथेअंक - 333वा l पाने -57

आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 2मे2025
वर्ष- चौथे
अंक - 333वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1sQ1tLEg-8Qg2c0V_PZkoB6uuWBkl17Nt/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 48
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे


 

मुक्ताफळे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

मुक्ताफळे

रोज नव नवे आरोप,
कानावरती आदळू लागले
ज्याला जे वाटेल ते,
मुक्ताफळे उधळू लागले.

त्यांनी उधळलेली मुक्ताफळे,
बेलगाम आणि स्वैर आहेत.
मुक्ताफळावरूनच कळते,
कोण किती सैरभैर आहेत?

राजकीय सैरभैरतेतच,
मुक्ताफळांचे उगम आहेत !
मुक्ताफळांचे अर्थ कळायलाही,
एकदमच सुगम आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8905
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 मे 2025
 

Thursday, May 1, 2025

आजचा अंकदैनिक वात्रटिका l 1 मे2025वर्ष- चौथेअंक - 332 वा l पाने -57


आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 1 मे2025
वर्ष- चौथे
अंक - 332 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1qqnCzCrGTLpmY209L6SiCEFdYSCM6-VW/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 46
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

 

जनगणनेचा कॉमन सेन्स...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका
-------------------

जनगणनेचा कॉमन सेन्स

जो तो जातीनिहाय जनगणेकडे,
विकासाची नवी संधी म्हणून बघत आहे.
म्हणूनच जातीनिहाय जनगणनेचे,
संपूर्ण देशभरातून प्रचंड स्वागत आहे

आमचीही हीच मागणी होती,
असा अचानक अनेकांचा आव आहे.
कुणाकुणाच्या मनात शंका कुशंका,
कुणाला वाटते हा फसवा डाव आहे.

कुणासाठी मास्टर स्ट्रोक तर,
देशासाठी ऐतिहासिक ठरतो आहे !
जातीनिहाय जनगणनेचा निर्णय,
तरीही बिहार भोवती फिरतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8904
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 मे 2025
 

Wednesday, April 30, 2025

दैनिक वात्रटिका l 30एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 331 वा l पाने -57


आजचा अंक 
दैनिक वात्रटिका l 30एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 331 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
काय आहे आजच्या अंकात? 
1) ग्रोकायन 45
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार 
वात्रटिका 
4) एका वात्रटिकेची कुळ कथा
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

#जातीनिहाय #जनगणना 
 #central #government #approves #caste #census
 

हेडलेस ?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

हेडलेस ?

हात दाखवून अवलक्षण,
एवढेच काय ते शेष आहे.
त्यांना जे 56 इंची वाटते,
हे म्हणतात,हेडलेस आहे.

कुणी म्हणाले वस्तुस्थिती,
कुणाच्या मते जोक आहे.
हेडलेसचा मराठी अर्थ तर,
चक्क बिनडोक आहे.

कोण हेडलेस? कोण बिनडोक?
जो जसे बघायचे तसे बघत आहे !
काँग्रेसच्या बिनडोकपणाचे मात्र,
पाकिस्तानात जंगी स्वागत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8903
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30एप्रिल2025
 

Tuesday, April 29, 2025

दैनिक वात्रटिका l 28 आणि 29एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 329+330 वा l पाने -60(जोड अंक)


आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 28 आणि 29एप्रिल2025
वर्ष- चौथे
अंक - 329+330 वा l पाने -60
(जोड अंक)
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1pYzKxV7WkHHYEq38niHQHUzaI8hUFG8v/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 44
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 50+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..

अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

 

पहलगाम का पैगाम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

पहलगाम का पैगाम

दहशतवाद्यांच्या तालावरती,
राजकीय नेते नाचू लागले.
आपापल्या अकलेचे पाढे,
एकमेकांसमोर वाचू लागले.

स्वतःला देशप्रेमी ठरवून,
इतरांना देशद्रोही ठरवू लागले.
भुकेल्या मीडियाला,
रोज नवे खाद्य पुरवू लागले.

पुन्हा राजकीय खडबड नको,
पुन्हा राजकीय गडबड नको !
ऐक्य आणि सुरक्षिततेसाठी,
नवी वायफळ बडबड नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8902
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29एप्रिल2025
 

Monday, April 28, 2025

चॅनल आणि वॉर ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

चॅनल आणि वॉर

इकडे टाकले बॉम्ब,
तिकडे क्षेपणास्त्र सुटू लागले आहेत.
न्यूज चॅनलवच्या पडद्यावरती,
युद्धाचे ढग दाटू लागले आहेत.

कुणाकुणाला नावे ठेवावीत?
सगळ्यांचा एकच गोतावळा आहे.
भारत आणि पाकिस्तान युद्धासाठी,
जणू सगळा मीडिया उतावळा आहे.

हवे तिथले पाणी बंद करून,
नको तिथे पाणी सोडता येऊ शकते !
रक्ताचा थेंब न सांडताही,
पाकिस्तानची खोड मोडता येऊ शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8901
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28एप्रिल2025
 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...