Wednesday, April 15, 2009

चप्पल म्हणाली बुटाला

******* वात्रटिका *******
*********************

चप्पल म्हणाली बुटाला

तुझा माझा जोडा
आता शोभुन दिसायला लागला
तुझ्याबरोबर माझाही प्रसाद
आता नेत्यांना बसायला लागला.

जनतेने ओळखले आहे,
पायाची वहाण पायीच बरी नाही !
मानसिक संतुलन ढासळल्याची
त्यांची दावेदारी काहीच खरी नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

1 comment:

Santoshi Salaskar said...

मस्तच ............. सगळ्या वात्रटिका छान आहेत. :)

daily vatratika...11april2025