Sunday, January 31, 2010

डरकाळ्यांचे व्यसन

***** आजची वात्रटिका *****
**********************

डरकाळ्यांचे व्यसन

अंबानीला म्हणाले,
रिकामे ’उद्योग’ करू नका.
सचिनला म्हणाले,
राजकारणात शिरू नका.

शहारूखचे तर
त्यांनी ’खान’दान काढले आहे !
ऊठसूट डरकाळ्या फोडण्याचे
वाघाला व्यसनच जडले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.

घरफोडीचा पंचनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- घरफोडीचा पंचनामा ज्यांनी घातला दरोडा, त्या दरोडेखोरांचे अपील आहे. आम्ही दरोडा घालणारच, जिथे घरमालक...