Showing posts with label आरोपांची जुगलबंदी. Show all posts
Showing posts with label आरोपांची जुगलबंदी. Show all posts

Tuesday, March 10, 2026

आरोपांची जुगलबंदी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
आरोपांची जुगलबंदी
आरोपावर आरोपांच्या,
फैरी सतत झाडल्या जातात.
आरोपांना आरोपांच्या,
साखळ्या सतत जोडल्या जातात.
आरोपाला प्रत्यारोपांची,
फुल ना फुलाची पाकळी असते.
कडीवर कडी ठरावी,
अशीच आरोपांची साखळी असते.
आरोपांची जुगलबंदी रंगताना,
सगळेच असे काही सुटू लागतात !
अत्यंत गंभीर आरोप सुद्धा,
चक्क हास्यास्पद वाटू लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9212
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 मार्च 2026

 

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कठपुतळ्या ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, देव्या त्यांच्या अंगात आहेत. शिकल्या सवरलेल्यांचे नखरे, ...