Monday, November 13, 2023

दैनिक वात्रटिका13नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -159 वा

दैनिक वात्रटिका
13नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -159 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

राजकीय आजारपण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय आजारपण

राजकीय नेत्यांच्या आजाराने,
कार्यकर्ते बेजार आहेत.
अत्यंत अनाकलनीय असे,
नेत्या-नेत्यांचे आजार आहेत.

नेत्यांच्या आजारपणाचा,
प्रकार पुन्हा पुन्हा घडतो आहे.
जो तो आपाआपल्या सोयीने,
पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे.

प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे,
अगदीच वेगवेगळे लक्षण आहे !
वादावादी पासून दूर कसे राहावे?
आजारपणातून शिक्षण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
11नोव्हेंबर2023
 

Saturday, November 11, 2023

दैनिक वात्रटिका11नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -157 वा


दैनिक वात्रटिका
11नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -157 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

स्वार्थकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
स्वार्थकारण
काल ज्यांचे खांद्याला खांदे होते,
आज त्यांचेच वांधे एके वांधे आहेत.
स्पष्ट सांगायचे झाले तर,
सगळेच उलटे सुलटे धंदे आहेत.
काल सरळ सरळ चालणारा,
आज अचानक अडवा येतो.
एकदा स्वार्थ आडवा आला की,
सरळ माणूसही कडवा होतो.
स्वार्थ कुठलाही असो,
त्याला संघर्षाचा नाद आहे !
यातून निष्कर्ष हाच की,
स्वार्थकारण जिंदाबाद आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
11नोव्हेंबर2023

 

Friday, November 10, 2023

दैनिक वात्रटिका10नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -156 वा

दैनिक वात्रटिका
10नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -156 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

10नोव्हेंबर... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका




 

जय हो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जय हो....

अध्यात्माच्या दरबारात,
नव-नवा बाबा हजर होतो.
अडेल पडेल भक्तांकडून,
दाभिकतेचा गजर होतो.

भक्तांच्या लायकीवरून,
बाबासुद्धा ओळखला जातो.
मीडियाच्या माध्यमातून,
भक्ती भाव झळकला जातो.

सच्चे संत आणि सच्चे भक्त,
दांभिकतेला आंबले आहेत !
जरा तुरुंगाकडे नजर टाका,
कोण कोण आत डांबले आहेत?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8393
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10नोव्हेंबर2023
 

Thursday, November 9, 2023

राजकीय सत्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय सत्य

कधी राजकारण पेटले जाते,
कधी राजकारणासाठी पेटवले जाते.
ज्याला जसे जसे उठवता येईल,
तसे तसे रानसुद्धा उठवले जाते.

जो राजकारणासाठी टपलेला
त्याला आयते भांडवल पुरवून जातो !
सत्याचा खरा चेहरासुद्धा,
राजकारणात सहज हरवून जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8392
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9नोव्हेंबर2023
 

Wednesday, November 8, 2023

दैनिक वात्रटिका8नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -155 वा

दैनिक वात्रटिका
8नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -155 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

सबुरीचे सल्ले...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
सबुरीचे सल्ले
इकडे यांचा झेंडा आहे,
तिकडे त्यांचा झेंडा आहे.
ग्रामपंचायतचे निकाल म्हणजे,
ताबेदारीचाच फंडा आहे.
दोन्ही बाजूंनी लढणारे,
त्यांचेच राजकीय पिल्ले आहेत !
जरा सबुरीने घ्या,
आमचे पिल्ल्यांना सल्ले आहेत !!
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
8नोव्हेंबर2023
 

Tuesday, November 7, 2023

दैनिक वात्रटिका7नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -154 वा


दैनिक वात्रटिका
7नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -154 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

तेंडुलकर आणि कोहली....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
तेंडुलकर आणि कोहली
सचिन हिमालय असेल तर,
विराट माउंट एव्हरेस्ट आहे.
जो तो आपापल्या ठिकाणी,
अगदीच ऑल दी बेस्ट आहे.
हिमालय आणि माउंट एव्हरेस्टची,
जशी तुलाच होऊ शकत नाही.
तशी एकमेकांशिवाय दोघांचीही,
खरी उंची लक्षात येऊ शकत नाही.
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात,
काळाच्या पटलावरती,
काळाचीच टिपणं आहेत !
भारतीय क्रिकेटला पडलेली,
ही जित्ती जागती स्वप्नं आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8392
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7नोव्हेंबर2023

 

Monday, November 6, 2023

दैनिक वात्रटिका6नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -153 वा



दैनिक वात्रटिका
6नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -153 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

देखते रहो..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
देखते रहो..
ज्याला जसे दफणायचे,
ते तसे दफणून घेत आहेत.
ज्याला जसे उफणायचे,
ते तसे उफणून घेत आहेत.
दफणणारे आणि उफणणारे,
यांचीच आज चलती आहे !
बघ्यांची सहनशीलता तर,
खूप जास्त सलती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
6नोव्हेंबर2023

 

Saturday, November 4, 2023

लोकसभेचे बोन्साय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-------------------------

लोकसभेचे बोन्साय

लोकसभा असो वा ग्रामपंचायत,
दोन्हीतही वेगळे ते काय आहे?
ग्रामपंचायत म्हणजे तर,
लोकसभेचेच बोन्साय आहे.

दोघींच्याही सारखेपणाबाबत,
सांगण्यासारखे तसे खूप आहे !
छोटा पॅकेज;बडा धमाका,
असेच ग्रामपंचायतचे रुप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
3 नोव्हेंबर2023

दैनिक वात्रटिका4नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -152 वा


 दैनिक वात्रटिका
4नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -152 वा 
अंक डाऊनलोड लिंक -

Friday, November 3, 2023

दैनिक वात्रटिका3नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -151 वा


दैनिक वात्रटिका
3नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे.
अंक -151 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

नो इंटरनेट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नो इंटरनेट

इंटरनेट नसले की,
लोक तडफडू लागतात.
पिंजऱ्यातल्या पिंजऱ्यात,
लोक फडफडू लागतात.

मोबाईल आणि इंटरनेट,
ही आधुनिक फॅशन आहे !
इंटरनेट जेवढी मूलभूत गरज,
त्याहून इंटरनेट व्यसन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
3 नोव्हेंबर2023
 

Wednesday, November 1, 2023

भांडवली उद्योग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
भांडवली उद्योग
जसे एखाद्याला हिरो केले की,
कुणाला तरी व्हीलन ठरवावे लागते.
तसे प्रेक्षकांच्या आवडीनुसार,
चित्रपटालाही खाद्य पुरवावे लागते.
लाइटिंग आणि फायटिंग सोबर
आयटम सॉंग्जचा डान्स असतो.
ज्याचे असते खरे भाग भांडवल,
त्यालाच खरा चान्स असतो.
कथा एकाची, पटकथाकार दुसरा,
संवाद लेखकही तिसरा असतो !
सगळे जमून आले तरी,
खरा फायनान्सरचा आसरा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
1 नोव्हेंबर2023

दैनिक वात्रटिका2नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..अंक -150वा


दैनिक वात्रटिका
2नोव्हेबर 2023....वर्ष- तिसरे..
अंक -150वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 
 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...