Wednesday, June 5, 2024

दैनिक वात्रटिका l 5जून2024 वर्ष- चौथेअंक -5 वा l पाने -45


दैनिक वात्रटिका l 5जून2024 
वर्ष- चौथे
अंक -5 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

लोकसभा निकालाचा अन्वयार्थ ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लोकसभा निकालाचा
अन्वयार्थ

सत्ताधारी आणि विरोधकांनाही,
जिंकल्यासारखे वाटते आहेत.
हारता हारता जिंकल्याचे,
सर्वांनाच समाधान भेटते आहे.

पराभवातल्या विजयाची,
एक वेगळीच अशी लज्जत आहे.
तमाम मतदारांनी लुटलेली,
एक्झिट पोलची इज्जत आहे.

पोलवाल्यांची इज्जत गेली,
ईव्हीएमची इज्जत वाचली आहे !
लोकशाहीच्या विजयाची वार्ता,
सगळ्या जगात पोचली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8583
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5जून2024
 

Tuesday, June 4, 2024

दैनिक वात्रटिका l 4जून2024 वर्ष- चौथेअंक -4 था l पाने -45


दैनिक वात्रटिका l 4जून2024 
वर्ष- चौथे
अंक -4 था l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

उलटा न्याय ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------


उलटा न्याय


संविधानावर चालणाऱ्या देशात,
सगळे कसे उलटे होऊ लागले.
संविधान मानणाऱ्या लोकांनाच,
धर्मविरोधी म्हटले जाऊ लागले.

भारत निधर्मी असला तरी,
इथे निधर्मी लोक चालत नाहीत.
तरी बरे धार्मिक दांभिकता दिसूनही,
खूप लोक त्याविरुद्ध बोलत नाहीत.

संविधान पूजकांनाच इथे,
शिव्या - शाप आणि दूषण आहे !
जे शिव्या - शाप आणि दूषण देतात,
त्यांचे तर जन्मजात शोषण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8582
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4जून2024
 

Monday, June 3, 2024

दैनिक वात्रटिका3जून2024 l वर्ष- चौथे

दैनिक वात्रटिका3जून2024 l वर्ष- चौथे
अंक -3 रा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

आमची आयडिया...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आमची आयडिया

एक्झिट पोल वाल्यांचा फायदा,
निवडणूक आयोगाने घ्यायला हवा.
लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार,
एक्झिट पोलवाल्यांना द्यायला हवा.

त्यांच्या अंदाजांचे घोडे,
अगदी बेलगाम दौदू शकतात.
निवडणुका न घेतासुद्धा,
ते लोकप्रतिनिधी निवडू शकतात.

यामुळे देशाचा फायदा असा की,
निवडणूकीच्या खर्चाची बचत आहे !
आम्ही सेफॉलॉजिस्ट नाहीत,
तरीही भन्नाट आयडिया सुचत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8581
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3जून2024
 

Sunday, June 2, 2024

दैनिक वात्रटिका2जून2024 l वर्ष- चौथे l अंक -2 रा

दैनिक वात्रटिका
2जून2024 l वर्ष- चौथे
अंक -2 रा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

एक्झिट पोलचे शास्त्र ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

एक्झिट पोलचे शास्त्र

पडणारे जिंकू शकतात,
जिंकणारे पडू शकतात.
एवढे सगळे पराक्रम,
पोलमध्येच घडू शकतात.

धन्य त्यांचे सॅम्पल,
धन्य त्यांचा डाटा आहे.
परस्परविरोधी अंदाजाने,
पोलवाल्यांचाच घाटा आहे.

जे जे शास्त्रीय आहे,
तेच अशास्त्रीय वाटू लागते !
पोलवाल्यांचे खरे भांडे,
निकालानंतरच फुटू लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8580
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2जून2024
 

Saturday, June 1, 2024

दैनिक वात्रटिका1 जून2024 l वर्ष- चौथेअंक -1 ला


दैनिक वात्रटिका
1 जून2024 l वर्ष- चौथे
अंक -1 ला l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

फाटाफुटीचे अंदाज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फाटाफुटीचे अंदाज

जशा काल अफवा उठल्या होत्या,
तशा त्या उद्याही उठू शकतात.
प्रत्येकच पक्षाला वाटू लागले,
आपण सोडून इतर फुटू शकतात.

आपल्याला आणि इतरांना,
त्यांची वेगवेगळी ' फुट ' पट्टी आहे.
एकमेकांना ते गृहीत धरतात,
हीच यामधली खरी खुट्टी आहे.

फाटाफुटीच्या अफवांवरून,
एक सत्य आपल्याला कळते आहे !
नदी कोणतीही असली तरी,
शेवटी ते सागरालाच मिळते आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8579
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1जून2024
 

Friday, May 31, 2024

दैनिक वात्रटिका31मे2024....वर्ष- तिसरे..अंक -358 वा


दैनिक वात्रटिका
31मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -358 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

अंदर की बात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अंदर की बात

जरी ओठात एक आहे,
जरी पोटात एक आहे.
तरी प्रत्येकाला वाटू लागले,
मी एकटाच नेक आहे.

तसे तर नेक कुणीच नाही,
प्रत्येकाचे वेगळे मनसुबे आहेत.
केवळ मजबुरी म्हणून,
आज ते एकत्र उभे आहेत.

ज्याच्या त्याच्याकडे तयार,
जर तरच्या गोष्टी आहेत !
ओठावर हसू असले तरी,
ते मनातून कष्टी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8578
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31मे2024
 

Thursday, May 30, 2024

दैनिक वात्रटिका30मे2024....वर्ष- तिसरे..अंक -357 वा ..

दैनिक वात्रटिका
30मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -357 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

बदनामीचे डावपेच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बदनामीचे डावपेच

यांचे त्यांना ; त्यांचे यांना,
अत्यंत विषारी चावे आहेत.
जिकडे बघावे तिकडे,
हल्ली बदनामीचे दावे आहेत.

नामी लोकांची बदनामी होते,
इथे तर सगळेच बदनाम आहेत.
एकमेकांच्या आरोपांमुळे,
त्यांना दरदरून घाम आहेत.

आपल्या हातानेच आपल्या,
त्यांची तोंडामध्ये माती आहे !
बदनामीच्या दावा ठोकणे,
एवढाच उपाय हाती आहे !


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8577
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30मे2024
 

Wednesday, May 29, 2024

दैनिक वात्रटिका29मे2024....वर्ष- तिसरे..अंक -356 वा


दैनिक वात्रटिका
29मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -356 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

अभ्यासक्रमाचे श्लोक ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अभ्यासक्रमाचे श्लोक

जे जे चांगले ते ते पुढे घेऊन जावे l
जे जे कालबाह्य ते ते टाकून द्यावे ll
परंपरा जपताना राखावे भान l
अभिमान हवा;नको दुराभिमान ll १ll

पुन्हा नव्याने तिची स्मृती का आली?
जाळून जिची पार राख रांगोळी केली ll
काळाची पावले उलटी फिरवू नका रे l
नव्याने पुन्हा मनुस मिरवू नका रे ll २ ll

विद्यार्थी बनावा ज्ञानयोगी समर्थ l
अंधभक्त होईल ते ज्ञान असे व्यर्थ ll
जगावे विज्ञान, वागावे विज्ञान l
नव्या युगाचे-जगाचे ठेवा भान ll ३ ll

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8576
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29मे2024
 

Tuesday, May 28, 2024

दैनिक वात्रटिका28मे2024....वर्ष- तिसरे..अंक -355 वा पाने -45


 दैनिक वात्रटिका
28मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -355 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

पुत्र व्हावा ऐसा गुंडा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पुत्र व्हावा ऐसा गुंडा

कायदा,सुव्यवस्था,आरोग्य,
सर्व व्यवस्थांचा वाजवावा गंडा.
अगदी अल्पवयातच,
ज्याने त्रिलोकी लावावा झेंडा.

पळवावी कार; चिरडावेत लोक,
आजमावावा रॅप गाण्याचा फंडा.
असावा निर्दयी आणि निर्ढावलेला,
ज्याला लाजावा प्रत्यक्ष गेंडा.

बाप आणि आजोबाबरोबर,
घरादाराचा लावावा कडी- कोंडा !
उद्या प्रत्येक बिल्डर म्हणेल,
पुत्र व्हावा ऐसा गुंडा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8575
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28मे2024
 

Monday, May 27, 2024

दैनिक वात्रटिका27मे2024....वर्ष- तिसरे..अंक -354 वा


दैनिक वात्रटिका
27मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -354 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

सावधान....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सावधान....

जे जे राजकारणाने पेरले,
ते समाजकारणात उगवू लागले.
गावोगावाचे गावकारण,
गावाकडूनच नागवू लागले.

कुठे उगवण थोडीफार,
कुठे उगवण अगदी जोरात आहे.
गोडपणा जाऊन कडवटपणा,
आज गावोगावच्या सुरात आहे.

अजूनही वेळ गेली नाही,
ही विषपेरणी आवरू शकता !
उंटांवरच्या शहाण्यांची गरज नाही,
तुम्हीच तुम्हाला सावरू शकता !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8574
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27मे2024
 

Sunday, May 26, 2024

दैनिक वात्रटिका26मे2024....वर्ष- तिसरे..अंक -353 वा पाने -45


दैनिक वात्रटिका
26मे2024....वर्ष- तिसरे..
अंक -353 वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

आचारसंहितेची वस्तुस्थिती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आचारसंहितेची वस्तुस्थिती

असून अडचण नसून खोळंबा
तिचेच नाव आचारसंहिता आहे.
गोंधळात गोंधळ वाढवणारी,
गाढवासमोर वाचलेली गीता आहे.

ज्यांनी आचारसंहिता पाळायची,
तेच सोयीनुसार मोडत असतात.
ज्यांचे काही देणे घेणे नाही,
नेमके तेच बळी पडत असतात.

आचारसंहिता पाळतो तो वेडा,
न पाळणाराच इथे शहाणा आहे !
ज्याला करायची उडवा उडवी,
त्याच्यासाठी आयताच बहाणा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8573
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26मे2024
 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...