Saturday, June 1, 2024

फाटाफुटीचे अंदाज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फाटाफुटीचे अंदाज

जशा काल अफवा उठल्या होत्या,
तशा त्या उद्याही उठू शकतात.
प्रत्येकच पक्षाला वाटू लागले,
आपण सोडून इतर फुटू शकतात.

आपल्याला आणि इतरांना,
त्यांची वेगवेगळी ' फुट ' पट्टी आहे.
एकमेकांना ते गृहीत धरतात,
हीच यामधली खरी खुट्टी आहे.

फाटाफुटीच्या अफवांवरून,
एक सत्य आपल्याला कळते आहे !
नदी कोणतीही असली तरी,
शेवटी ते सागरालाच मिळते आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8579
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1जून2024
 

No comments:

ऑर्डर....ऑर्डर...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑर्डर....ऑर्डर... आपल्या न्यायव्यवस्थेचा, असा विचित्र प्रकार पाहिला नाही. प्रत्यक्ष कोर्टांच्या निर्णयाव...