Tuesday, June 18, 2024

ईव्हीएमची बदनामी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ईव्हीएमची बदनामी

नको नको त्याच्या तोंडामध्ये,
नको नको ती ओळ घालतात.
ईव्हीएमच्या नावाने,
पुन्हा पुन्हा नवा घोळ घालतात.

राजकारणी एकपट असतील तर,
मीडियावाले त्यांच्या दसपट आहेत.
पहिल्यापेक्षा दुसऱ्याकडून,
ईव्हीएम बाबतचे खुसपट आहेत.

रोज नव्या वावड्या आहेत,
रोज नव्या नव्या फपाऱ्या आहेत !
जणू ईव्हीएमच्या बदनामीच्या,
सगळ्यांकडूनच सुपाऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8596
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18 जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...