Monday, June 24, 2024

पेपरफोड्या...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पेपरफोड्या

भारतासारखा पेपरफोड्या देश,
अजून तरी कुणीच पाहिला नसेल.
देशात फुटायचा राहिला आहे,
असा एकसुद्धा पेपर राहिला नसेल.

केजी पासून थेट पीजी पर्यंत,
सगळेच पेपर इथेच फुटू शकतात.
पेपरफोडीसाठी चांगला स्कोप आहे,
तसे गिऱ्हाईकही इथेच भेटू शकतात.

पेपरफुटी विरोधी कायदा झाला,
तो कायदा अधिकाधिक सक्त होईल !
पण पेपरफुटीमुळेच आपला देश,
एक दिवस नक्की कॉपीमुक्त होईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8602
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...