Monday, June 17, 2024

दबाव तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

दबाव तंत्र

छोटा भाऊ;मोठा भाऊ,
सांगताना त्यांना धाप आहे.
मध्येच कुणीतरी बॅनर लावतो,
शेवटी बाप हा बाप आहे.

छोटे भाऊ;मोठे भाऊच,
एकमेकांचा बाप काढू लागले.
विरोधकांवर काढायचा तर,
मित्रांवरच संताप काढू लागले.

उचलली जीभ लावली टाळ्याला,
सांगा कुणाच्या जिभेला हाड आहे?
छोटा मोठा म्हणणाऱ्यांनाच,
यंदापासून स्ट्राइक रेटचे फॅड आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8595
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17 जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 120वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 120वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1f0XHZEXoWSMLksTOZg8...