Wednesday, June 19, 2024

बघे आणि टगे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बघे आणि टगे

जेवढ्या प्रमाणात समाजामध्ये,
बघे वाढत चाललेले आहेत.
तेवढ्या प्रमाणात समाजामध्ये,
टगे वाढत चाललेले आहेत.

टगे लोकांची आणि बघे लोकांची,
अत्यंत छुपी अशी दोस्ती आहे.
बघे लोकांच्या जीवावरतीच.
सगळ्या टगे लोकांची मस्ती आहे.

प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे,
आपण बघे आहोत की टगे आहोत?
याचे उत्तर मात्र असे यायला नको,
आपण स्वतः दोघे आहोत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8597
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 120वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 120वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1f0XHZEXoWSMLksTOZg8...