Tuesday, June 25, 2024

धक्कादायक पेपरफुटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

धक्कादायक पेपरफुटी

नीट परीक्षेतील पेपरफुटी,
हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे.
हा काही फक्त अंदाज नाही,
हे आमचे मत तर रोखठोक आहे.

आम्हाला काय म्हणायचे आहे?
हे तुम्हीही समजून घेऊ शकतात.
देशातले सगळे शैक्षणिक पॅटर्न,
नक्की धोक्यामध्ये येऊ शकतात.

पॅटर्न काय? फॅक्टरी काय?
सगळा कच्चा माल पक्का आहे !
तुमच्या आमच्या शैक्षणिक श्रद्धांना,
परीक्षे - परीक्षेमध्ये धक्का आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8603
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...