Saturday, June 22, 2024

भावनिक लाटा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भावनिक लाटा

तर्कशुद्ध विचार म्हटले की,
सगळे कसे गपगार आहेत.
आज-काल छोटे मोठे मुद्दे सुद्धा,
भावनिक लाटेवर स्वार आहेत.

लोकांना भावनिक केले की,
सहानुभूतीच्या लाटा येऊ लागतात.
छोट्या मोठ्या चुका सुद्धा,
आपोआप बरोबर होऊ लागतात.

लोकांना भावनिक करण्याचे धडे,
हल्ली सगळेच गिरवू लागले !
सहानुभूतीच्या लाटांमध्ये,
वास्तवाबरोबर सत्यही हरवू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8600
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 112वा l

दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 112वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1agArPwvhBfdpeNBl30k...