आजची वात्रटिका
--------------------------
अशी ही घुमवाघूमवी
खेळवा आणि खेळवत रहा,
याच्यामध्येच अगदी सगळे असते.
प्रत्येक निवडणुकीचे गणित,
पहिल्यापेक्षा अगदी वेगळे असते.
जसे विरोधातले सोबतीला असतात,
तसेच सोबतीचे विरोधात असतात.
काल परस्परांना शिव्या देणारे.
आज मात्र पोवाडे गात असतात.
काल वेगळे ;आज वेगळे,
उद्या तिसरेच काही जमवले जाते !
कुठलीतरी नशा चढवून चढवून,
सामान्य जनतेला घुमवले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8590
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12 जून2024
No comments:
Post a Comment