Sunday, June 30, 2024

राजकीय लाड...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय लाड

कुणासाठी लाडका भाऊ आहे,
कुणासाठी लाडकी बहीण आहे.
कुणासाठी लाडका सासरा,
कुणासाठी लाडकी विहीन आहे.

कुणासाठी लाडकी भावजय,
कुणासाठी लाडकी नणंद आहे,
राजकीय लाडकेपणाचा,
सगळाच आनंदी आनंद आहे.

कुणासाठी लाडका बेटा आहे,
कुणासाठी लाडकी बेटी आहे !
लाडका जावई;लाडकी सून,
घराणेशाहीची समस्या मोठी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8608
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30जून2024
 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...