Saturday, June 15, 2024

ऑर्गनाईज्ड विश्लेषण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ऑर्गनाईज्ड विश्लेषण

जो ऑर्गनाईज करतो,
त्याला ऑर्गनायझर म्हटले जाते.
निवडणूकीच्या विश्लेषणावरती,
म्हणूनच वादळ उठले जाते.

मातृ-पितृ देवो भव म्हणून,
विश्लेषण शिरसावंद्य मानले आहे.
नो कॉमेंट्सचे रहस्य,
जाणायचे त्यानेच जाणले आहे.

निवडणुकीतल्या संघ भावनेकडे,
जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे !
घसरलेल्या ब्रँड व्हॅल्यूला,
म्हणे लोकसभेची साक्ष आहे ! !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8593
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 112वा l

दैनिक वात्रटिका l 20सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 112वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1agArPwvhBfdpeNBl30k...