Wednesday, June 26, 2024

ज्याची त्याची कट्टरता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

ज्याची त्याची कट्टरता

मी अममक्याचा समर्थक आहे,
मी तमक्याचा कार्यकर्ता आहे.
ज्याच्या त्याच्या ओळखीची,
आता अशी नवीनच वार्ता आहे.

आयजीच्या जीवावर बायजी उदार,
असेच बांडगुळं पोसायला लागले.
जिकडे बघावे तिकडे,
एकसारखेच बॅनर दिसायला लागले.

आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची,
ना ओळख आहे; ना पाळख आहे !
आपल्या लाचारी आणि मिंधेपणाची,
कट्टरता अशी नवी ओळख आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8604
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28जून2024 वर्ष- चौथेअंक -28वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 28जून2024  वर्ष- चौथे अंक -28वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1txq8SETNwvxPsGVPyNXCkp1iHc...