Friday, June 7, 2024

राजकीय चक्र ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय चक्र

विलीनीकरणाची असते मजबुरी,
फाटाफुटीचा मात्र राग आहे.
विलीनीकरण आणि फाटाफूट,
हा राजकीय चक्राचा भाग आहे.

पंचवार्षिक टप्पे पाडीत,
राजकीय चक्र फिरत असते.
कुणी फिरून परत आले की,
त्यांची घरवापसी ठरत असते.

जसा निष्ठावंत आणि निष्ठावंतच,
परस्परांचा सहृदय होत असतो !
तसा बंडखोरातूनच बंडखोर,
आणि पक्षातूनच पक्षाचा उदय होतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8585
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...