Saturday, June 8, 2024

सोंगाडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सोंगाडे

बातम्यांपेक्षा अफवांनाच,
जास्त महत्त्व येऊ लागले.
प्रचार सोडून अपप्रचारच,
लाटेवर स्वार होऊ लागले.

खरे पेरणे अवघड झाले,
खोटे आपोआप उगवू लागले.
स्वतः झोपेचे सोंग घेऊन,
इतरांना मात्र जागवू लागले.

सारे काही सत्तेसाठी ..
त्यांचा उद्देशही साफ आहे !
प्रेमात आणि युद्धामध्ये,
म्हणे सगळेच तर माफ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8586
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...