Sunday, June 23, 2024

तिसरी बाजू...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

तिसरी बाजू

विश्वासघातावर विश्वासघात,
धोक्यावर धोके वाढत जातात.
जेव्हा टोकाचे मतभेद होतात,
तेंव्हा पाठीराखे वाढत जातात.

ज्याला त्याला वाटत राहते,
आपण घेतलेलीच बाजू खरी आहे.
तापलेले वातावरण पेटण्यासाठी ,
फक्त एक ठिणगी सुद्धा पुरी आहे.

दोघांच्या बाजू खऱ्या वाटल्या तरी
त्याला तिसरीही बाजू असू शकते !
जो तटस्थपणे विचार करील,
फक्त त्यालाच ती बाजू दिसू शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8601
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 120वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 120वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1f0XHZEXoWSMLksTOZg8...