Friday, June 14, 2024

मजबुरीचा सल्ला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका
--------------------------

मजबुरीचा सल्ला

मतदाराला चॅलेंज करावे,
अशी कुणातही ऐपत नाही.
हुकूमशाहीची भाषासुद्धा,
त्यामुळेच तर झेपत नाही.

जरी लोकशाही मार्गावरती,
दंडेलशाहीचा पोतारा आहे
झुंडशाही आणि गुंडशाहीवर,
लोकशाहीकडेच उतारा आहे.

डोक्यात गेलेल्या हवेवर,
कुणी स्वार होता कामा नये!
अति झाले आणि हसू आले..
एवढेही फार होता कामा नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8592
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14 जून2024

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...