Thursday, June 6, 2024

पराभवाचा लेखाजोखा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पराभवाचा लेखाजोखा

विजय वाढवतो आत्मविश्वास,
पराभव मात्र त्रागा करत असतो.
विजयाची चढते नशा,
पराभव संशय जागा करत असतो.

काल बसलेल्या घड्या,
पराभवाने विस्कटल्या जातात.
जमून आलेले डावसुद्धा,
पराभवाने फिस्कटल्या जातात.

चिंतन आणि मंथन,
ही पराभवाची जुळी अपत्य आहेत !
कोणताही पराभव पचवायची,
कडक आणि कठोर पथ्य आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8584
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...