आजची वात्रटिका
--------------------------
थप्पड की गूंज
कंगनाने खाल्लेल्या थप्पडची,
बघा केवढी मोठी रेंज आहे ?
मीडिया ते सोशल मीडिया,
कुलविंदरच्या थप्पडची गूंज आहे.
बंडखोराचे कौतुक झाले तरी,
समाजाला बंडखोरी नको वाटते.
तुम लढो हम कपडे संभालते,
त्याला फक्त तमाशा देखो वाटते.
बंडखोर करतो बंडखोरी,
त्याचे फळ त्याला भोगावे लागते !
समाजाला कधीतरी कळावे,
समाजासाठीही जगावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8587
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9जून2024
No comments:
Post a Comment