Monday, June 10, 2024

नवे मंत्रिमंडळ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
नवे मंत्रिमंडळ
जिंकलेले आणि हरलेले,
दोघांनाही मंत्री पद आहे.
मंत्रिमंडळ शपथविधीतून,
नेमका हाच बोध आहे.
जे जे गल्लीत झाले,
ते ते थेट दिल्लीत झाले.
प्रफुल्लित चेहरे उदास,
उदास मात्र प्रफुल्लित झाले.
नवे आहेत;जुने आहेत,
काही तेच तेच चेहरे आहेत !
मंत्रिमंडळ समतोलासाठी,
काही राखीव मोहरे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8588
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10 जून2024




 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...