Saturday, June 29, 2024

बजेटचे ऑडिट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बजेटचे ऑडिट

अर्थसंकल्पाचा अर्थ लावताना,
शब्दांचे बजेट काही बसत नाही.
सत्ताधाऱ्यांचा अर्थसंकल्प,
विरोधकांना कधी नीट दिसत नाही.

घोषणा आणि थापांभोवतीच,
प्रत्येक अर्थसंकल्प फिरवला जातो.
आपल्याला पाहिजे तोच अर्थ,
अगदी संकल्पपूर्वक मूरवला जातो.

काही स्वस्त;काही महाग,
बाकी सगळे मध्यम मध्यम असते !
आपला अजेंडा राबवायला,
विरोधकांना बजेटचे माध्यम असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8607
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 287 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 16मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 287 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1IgvOxnHPGFLNovIXQi...