Tuesday, June 11, 2024

स्ट्राइक रेट ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

स्ट्राइक रेट

राजकारणावरही क्रिकेटचा,
परिणाम किती थेट झाला आहे.
क्रिकेट प्रमाणेच राजकारणातही,
आता स्ट्राइक रेट आला आहे.

राजकीय वजन मोजण्यासाठी,
जणू क्रिकेटची तुला आहे.
लढल्या किती? जिंकल्या किती?
स्ट्राइक रेटचा फॉर्मुला आहे.

जशा लोकसभेच्या स्ट्राईक रेट वरती,
विधानसभेच्या जागा वाटल्या जातील!
तशा पिचचा अंदाज घेवूनच,
विधानसभेच्या जागा लाटल्या जातील !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8589
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11 जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 120वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 120वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1f0XHZEXoWSMLksTOZg8...