Friday, June 21, 2024

उपोषण आणि प्रतिउपोषण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उपोषण आणि प्रतिउपोषण

उपोषणांची टिंगल टवाळी,
या देशाला काही नवी नाही.
असासुद्धा कुणी नसेल,
ज्याला उपोषणाची चर्चा हवी नाही.

उपोषणाविरुद्ध उपोषण,
उपोषणांची जुगलबंदी आहे.
भावी उपोषणकर्ते शोधू लागले,
आपल्याला कुठे कुठे संधी आहे?

भरल्या पोटी ढेकर देत देत,
समर्थकांचे दुटप्पी वर्तन आहे !
दुसऱ्याच्याला विरोध करताना
आपल्याचे मात्र समर्थन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8599
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 120वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 28सप्टेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 120वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1f0XHZEXoWSMLksTOZg8...