Friday, June 28, 2024

धुसफुशीचा आढावा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

धुसफुशीचा आढावा

महाआघाडी असो वा महायुती,
दोन्हीकडेही सारखीच धुसफूसआहे.
लोकसभेतल्या एकजुटीला,
आगामी विधानसभेची घूस आहे.

वाढत्या धुसफुशीचे कारण,
प्रत्येकाचा आपला पॉवर गेम आहे.
महायुती असो वा महाआघाडी,
सगळेच कसे सेम टू सेम आहे.

कितीही धुसफूस झाली तरी,
दुही काही माजूच शकत नाही !
प्रत्येकालाच खात्री आहे,
एकट्याची डाळ शिजूच शकत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8606
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...