Thursday, June 27, 2024

चहापान परंपरा जिंदाबाद !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

चहापान परंपरा जिंदाबाद !

जणू आदरातिथ्याचा देखावा म्हणून,
अधिवेशन चहापानाची परंपरा आहे.
विरोधकांनी बहिष्कार टाकावा म्हणून,
अधिवेशन चहापानाची परंपरा आहे.

प्रत्येक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला,
सरकारकडून परंपरा पाळली जाते.
बहिष्कार घालण्याची परंपराही,
विरोधकांकडूनसुद्धा पाळली जाते.

अधिवेशन चहापान परंपरेला,
सगळ्यांकडून सारखीच दाद आहे !
सत्ताधारी आणि विरोधक,
बदलले तरी परंपरा जिंदाबाद आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8605
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...