Thursday, June 20, 2024

वर्धापन दिन ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वर्धापन दिन

त्यांचेही वर्धापन दिन दोन झाले,
यांचेही वर्धापन दिन दोन झाले.
मशाल विचारी तुतारीला,
कुणाच्या मुळावर कोण आले?

त्यांच्या चालल्या कुरघोड्या,
उगीच आपल्या डोक्याला ताण.
घड्याळातले काटे मोजीत,
धनुष्याने जोरात ताणला बाण.

एकाचे दोन;दोनाचे चार झाले,
याची कुणालाच खंत नाही !
कोण असली?कोण नकली?
या वादाला कधीच अंत नाही !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8598
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20जून2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...