आजची वात्रटिका
--------------------------
घराणेशाहीचा बोलबाला
वाढत्या घराणेशाहीवर तर,
सगळ्याच पक्षांकडून बोलले जाते.
आपल्या घराणेशाहीला मात्र,
राजकीय कर्तृत्वात तोलले जाते.
दुसऱ्यांना नाव ठेवायला,
साध्या बारशाचीही गरज नाही.
हातच्या काकणाला तर,
साध्या आरशाचीही गरज नाही.
त्यांच्या कथनी आणि करणी मध्ये,
खूप मोठे दुरावेच दुरावे आहेत !
सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये,
घराणेशाहीचे पुरावेच पुरावे आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8591
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13 जून2024
No comments:
Post a Comment