Thursday, July 11, 2024

गोंधळाचे स्वातंत्र्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गोंधळाचे स्वातंत्र्य

लोकशाहीच्या सभागृहात,
एकमेकांना पुरून उरू शकतात.
फक्त विरोधकच नाही तर,
सत्ताधारीही गोंधळ करू शकतात.

सभागृहात गोंधळ घालण्याचे स्वातंत्र्य,
लोकशाहीने सर्वांनाच दिलेले आहे.
गोंधळाचे प्रमाण कमी असले तरी,
हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.

कुणी कुणासमोर गीता वाचायची?
हा प्रश्न खोचक पण खरा आहे !
सगळेच एकमुखाने म्हणू लागले,
फक्त आमचाच गोंधळ बरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8619
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11जुलै 2024
 

Wednesday, July 10, 2024

दैनिक वात्रटिका l 10जुलै2024 वर्ष- चौथेअंक -40 वा

दैनिक वात्रटिका l 10जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -40 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे .

 

इमेज बिल्डिंग ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

--------------------------

इमेज बिल्डिंग

विधानसभा निवडणुकीसाठी,
आता वेगळीच फिल्डिंग आहे.
वादा ते दादा..... अशी,
भाडोत्री इमेज बिल्डिंग आहे.

आपलीच प्रतिमा आपलीच वैरी,
तिला तर धरणाचे डॅमेज आहे.
नव्या प्रतिमेच्या विरोधात,
आपलीच जुनी इमेज आहे.

प्रतिमा कितीही उजाळली तरी,
प्रतिमेला जुनाच वारसा आहे !
जुन्या नव्या प्रतिमेचा साक्षीदार,
काकांच्या हातचा आरसा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8618
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10जुलै 2024

Tuesday, July 9, 2024

दैनिक वात्रटिका l 9जुलै2024 वर्ष- चौथेअंक -39 वा


दैनिक वात्रटिका l 9जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -39 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे .
 

निष्ठावान झाले बंदीवान ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

निष्ठावान झाले बंदीवान

कांटे की टक्कर असली की,
जीवाचे एकच रान करावे लागते.
घोडे बाजाराचा अंदाज आला की,
निष्ठावानालाही बंदिवान करावे लागते.

निष्ठावान कधी संधीवान होतील,
याचीसुद्धा काही गॅरंटी देता येत नाही.
निष्ठावान बंदीवान केले तरी,
त्यांच्याकडूनही गॅरंटी घेता येत नाही.

बंदिवान असतात नजर कैदेत,
पण त्यांची नजर कैद करता येत नाही !
ज्यांनी केले इतरांचे विश्वासघात,
त्यांनाच मग विश्वास पेरता येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8617
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9जुलै 2024
 

Monday, July 8, 2024

दैनिक वात्रटिका l 8जुलै2024 वर्ष- चौथेअंक -38 वा

दैनिक वात्रटिका l 8जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -38 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

पालखी आणि दिंडी सोहळा


 

झुंडशाहीचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

झुंडशाहीचे वास्तव

जे ते आपल्या झुंडशाहीला,
चक्क लोकशाही म्हणायला लागले.
ऐकणारे ऐकून घेतात म्हणून,
अजून काही बाही म्हणायला लागले.

झुंडी कुणाच्याही असल्या तरी,
शेवटी झुंडी ह्या झुंडी असतात.
झुंडी-झुंडीने टाकलेले डाव सुद्धा,
जेवढे कुटील तेवढेच रंडी असतात.

दबाव गट आणि प्रभाव गट,
हाच झुंडशाहीचा आत्मा असतो !
जिथे भिडतात झुंडीला झुंडीला,
तिथे लोकशाहीचा खात्मा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8616
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8जुलै 2024
 

Sunday, July 7, 2024

दैनिक वात्रटिका l 7जुलै2024 वर्ष- चौथेअंक -37 वा


दैनिक वात्रटिका l 7जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -37 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

प्रचाराचा सल्ला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रचाराचा सल्ला

काम कमी करूनसुद्धा,
जादा करून सांगता आले पाहिजे.
विरोधकांच्या विरोधालासुद्धा,
वेशीवरती टांगता आले पाहिजे.

या राजकीय सल्ल्यामधून,
तुम्ही बरेच काही शिकू शकता.
अगदी गव्हाच्या भावामध्ये,
तुमचे बरबडेही विकू शकता.

विचार बिचार सोडून द्या,
प्रचाराच्या तंत्रावरती स्वार व्हा !
वितभर करा; हातभर सांगा,
प्रचाराच्या मंत्रावरती स्वार व्हा !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8615
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7जुलै 2024
 

Saturday, July 6, 2024

दैनिक वात्रटिका l 6जुलै2024 वर्ष- चौथेअंक -36 वा

दैनिक वात्रटिका l 6जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -36 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

फुकटची चढओढ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फुकटची चढओढ

इथून तिथून सगळीच,
पंचाईत करून ठेवली आहे.
प्रत्येक सरकारने लोकांना,
फुकटची सवय लावली आहे.

ज्याला गरज नाही त्यालाही,
फुकटचे लाभार्थी केले आहे.
एकाचे पाहून दुसऱ्याला,
सरकारने स्वार्थी केले आहे.

देणारा आणि घेणारांनाही,
देवघेव गोड लागली आहे !
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर,
फुकटची चढाओढ लागली आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8614
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6जुलै 2024
 

Friday, July 5, 2024

दैनिक वात्रटिका l 5जुलै2024 वर्ष- चौथेअंक -35 वा


दैनिक वात्रटिका l 5जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -35 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

लाडकी बहीण..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

लाडकी बहीण

लाडकी बहीण योजनेमुळे,
विरोधक चिंतातूर झाले आहेत.
लाडक्या बहिणीच्या नवऱ्याला,
तीन-तीन सरकारी साले आहेत.

एका घरात दोन लाभार्थी,
परेशान साडू साडू झाले आहेत.
दोघांच्याही हातामध्ये,
बारी- बारी ने झाडू आले आहेत.

कुठे कुठे सासू आणि सूनसुद्धा,
परस्परांची लाडकी बहीण आहे !
कुणी सवतीमत्सर न करण्याचीही,
लाडक्या योजनेची टॅग लाईन आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8613
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5जुलै 2024
 

Thursday, July 4, 2024

दैनिक वात्रटिका l 4जुलै2024 वर्ष- चौथेअंक -34 वा

दैनिक वात्रटिका l 4जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -34 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

भूल भुलैय्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भूल भुलैय्या

लोकशाहीच्या सभागृहात,
वैयक्तिक दुश्मनी काढली जाते.
लोकहितापेक्षा स्वहिताचीच चर्चा,
सभागृहांमधून घडली जाते.

लोकसन्मानापेक्षाही त्यांना,
आत्मसन्मान मोठा वाटतो आहे.
त्यांचा लोकशाहीचा पुळका,
त्यामुळेच खोटा वाटतो आहे.

आपल्या वैयक्तिक लढायांना,
लोकहिताचा बेगडी रंग आहे !
हा तर स्वतःकडून स्वतःचा,
सरळ सरळ हक्कभंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8612
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4जुलै 2024
 

Wednesday, July 3, 2024

दैनिक वात्रटिका l 3जुलै2024 वर्ष- चौथेअंक -33 वा

दैनिक वात्रटिका l 3जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -33 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

तडीपरी आणि निलंबन ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

तडीपरी आणि निलंबन

लाडा लाडाने हातवारे करण्याचा,
कुणाचाच चाळा काही बरा नाही.
शिवीगाळ करीत डॉनवेपणा करणे,
असला असंसदीयपणा खरा नाही.

दिल्ली पासून मुंबई पर्यंत,
विरोधी पक्ष नेते गोत्यात आहेत.
निलंबनास्राचे हुकमी बाण,
सत्ताधाऱ्यांच्या भात्यात आहेत.

तडीपारी कुठलीही असली तरी,
शेवटी तडीपारी ती तडीपारी आहे !
प्रासादिक वाणीची अपेक्षा,
जेवढी बरी तेवढीच खरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8611
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
3 जुलै 2024
 

Tuesday, July 2, 2024

दैनिक वात्रटिका l 2जुलै2024 वर्ष- चौथेअंक -32 वा l पाने -45


दैनिक वात्रटिका l 2जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -32 वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

विजयाचे श्रेय...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विजयाचे श्रेय

पाऊस पडून गेल्यावरती,
बेडकांचे डराव डराव आहेत.
कुणी जिंकला विश्व कप?
कुणाच्या अभिनंदनचे ठराव आहेत?

क्रिकेट आणि राजकारणाचे,
अगदी सततचे लागेबांधे आहेत.
दोघेही एकमेकात घुसले की,
मग सगळ्याचेच वांधे आहेत.

ज्याच्या त्याच्या विजयाचे श्रेय
ज्याचे त्यालाच मिळाले पाहिजे !
नको त्याचा जय जयकार नको,
किमान एवढे तरी कळाले पाहिजे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8610
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 जुलै 2024
 

Monday, July 1, 2024

दैनिक वात्रटिका l 1जुलै2024 वर्ष- चौथेअंक -31वा

दैनिक वात्रटिका l 1जुलै2024 
वर्ष- चौथे
अंक -31वा l पाने -45
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

मोबाईल जिंदगी ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मोबाईल जिंदगी

सारे काही स्टेटस साठी,
सारे काही रील्ससाठी आहे.
आपल्या मोबाईल जिंदगीची,
ऑनलाइन समस्याच मोठी आहे.

ऑफलाइन जगण्याला,
ऑनलाइन जगण्याचा आधार आहे.
येथे मृत्यूचे भय कुणाला?
आपली जिंदगीसुद्धा उदार आहे.

जान जाय पर व्हिडिओ न जाय,
कशाला एवढी बलामत पाहिजे?
व्हिडिओ-बिडियो पचास निघतील,
त्यासाठी जिंदगी सलामत पाहिजे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8609
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 जुलै 2024
 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...